दोन अनाथांच्या जुळणार रेशीमगाठी
By Admin | Updated: August 15, 2014 01:34 IST2014-08-14T01:24:36+5:302014-08-15T01:34:15+5:30
सोमनाथ खताळ , बीड लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवलेले... खेळण्या बागडण्याच्या दिवसात दूर्धर आजार जडला... यातून सावरणे कठीण... समाजाच्या नजरेत या तुच्छ बनल्या... म्हणून

दोन अनाथांच्या जुळणार रेशीमगाठी
सोमनाथ खताळ , बीड
लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवलेले... खेळण्या बागडण्याच्या दिवसात दूर्धर आजार जडला... यातून सावरणे कठीण... समाजाच्या नजरेत या तुच्छ बनल्या... म्हणून नातेवाईकांनी बीडच्या आश्रमात दाखल केले...संचालकांनी मायेची ऊब दिली... पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या या दोन लेकींची गुरूवारी थाटामाटात ‘बिदाई’ होणार आहे.
प्रियंका आणि पूजा (नाव बदलेले) असे या दोन वधुंची नावे. प्रियंकाचे शिक्षण बी.ए. तर पुजा यावर्षी बारावीत आहे. प्रियंका ही आठ व पुजा दीड वर्षापूर्वी इन्फंट इंडीयात आले. दुर्दैवी बाब म्हणजे या दोघींनाही आई-वडीलांपासूनच हा आजार जडला होता. या आजारानेच जन्मदात्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नातेवाईकांनी या दोघींनाही आनंदवनात आणून सोडले. या दोघींसाठी स्थळ आल्यानंतर शहानिशा करून व पसंती मिळताच रेशीमगाठी जुळविण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही व्यवसाय करून पोट भरतात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त काढून या दोन मुलींच्या रेशीमगाठी जुळण्याचा योग आला आहे.
या विवाह सोहळ्यासाठी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, धुंडीराजशास्त्री पाटांगणकर, टी.एन.व्ही.अय्यर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची उपस्थिती राहणार इन्फंटचे संचालक दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे यांनी सांगितले.
मदतीचा ओघ...
या दोन अनाथ लेकींच्या विवाह सोहळ्यासाठी दानशुरांचा ओघ असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी अन्नदानाचा तर काहींनी मंडप व इतर साहित्याचा खर्च उचलला आहे. डॉ. किरण व डॉ.सुधीर हिरवे, डॉ.अनिल बारकुल, डॉ. राजेंद्र वीर, संदीप कटारीया, तृप्ती अय्यर, अंकुशराव कदम, निलेश गीद आदींचा समावेश आहे.