शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या मदतीने जुळल्या रेशीमगाठी

By admin | Updated: August 13, 2014 01:43 IST

अजिंठा पोलिसांच्या मदतीने दोन्ही कुटुंबांचे मनपरिवर्तन करण्यात आले अन् पोलिसांनीच कन्यादान करून दुभंगलेल्या प्रियकर-प्रेयसीच्या रेशीमगाठी जुळवून दिल्या.

श्यामकुमार पुरे, अजिंठादेवदर्शनासाठी आलेल्या प्रेमीयुगुलास धमकावून प्रियकराच्या डोळ्यादेखत पे्रयसीवर बलात्कार केल्याची घटना २५ मे रोजी सिल्लोड तालुक्यात आमसरी येथे घडली होती. या घटनेनंतर प्रियकराने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला होता. मात्र १२ आॅगस्ट रोजी अजिंठा पोलिसांच्या मदतीने दोन्ही कुटुंबांचे मनपरिवर्तन करण्यात आले अन् पोलिसांनीच कन्यादान करून दुभंगलेल्या या प्रियकर-प्रेयसीच्या रेशीमगाठी जुळवून दिल्या. जळगाव जिल्ह्यातील एक पे्रमीयुगुल सिल्लोड तालुक्यातील (अंबऋषी) आमसरी येथे देवदर्शनासाठी आले होते. येथील चार जणांनी त्यांना अडवून बेदम मारहाण केली व आम्ही वन कर्मचारी आहोत, तुम्ही जंगलात काय करता, तुम्हाला पोलिसांत देतो, असे म्हणून त्यांचे मोबाईलमध्ये अश्लील चित्रीकरण केले. प्रियकराच्या डोळ्यांदेखत दोघांनी पे्रयसीवर बळजबरी बलात्कार केला. तसेच त्याचे चित्रीकरणही केले. या घटनेची माहिती कुणाला दिली तर बदनामी करू, अशी त्यांना धमकी दिली. बदनामी होईल म्हणून त्या दोघांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. मात्र, या दोघांनी मित्रांची बदनामी व्हावी म्हणून मोबाईलवर ती शूटिंग फारवर्ड केली. यातूनच ही माहिती मुलीच्या घरच्यांना कळाली. त्यांनी मुलीला धीर देत अजिंठा ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी त्या चार आरोपींना अटक केली.अजिंठा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी त्या पीडित मुलीस बहीण मानले. दोन्ही परिवारांच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे मनपरिवर्तन केले. त्यानंतर जुन्या विचारांना फाटा देत अखेर दोन्ही परिवार त्या दोघांचे लग्न करण्यास तयार झाले.