शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कुंभेफळला ‘रॅडिको’च्या दूषित पाण्याचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:03 IST

शेंद्रा औद्योगिक परिसरातील रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज कंपनीने नाल्यामध्ये सोडलेले रसायनमिश्रित लाल रंगाचे दुर्गंधीयुक्त पाणी कुंभेफळ व परिसरातील दहा ते पंधरा गावांमध्ये शिरले असून नागरिक व जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेंद्रा औद्योगिक परिसरातील रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज कंपनीने नाल्यामध्ये सोडलेले रसायनमिश्रित लाल रंगाचे दुर्गंधीयुक्त पाणी कुंभेफळ व परिसरातील दहा ते पंधरा गावांमध्ये शिरले असून नागरिक व जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. रसायनमिश्रित पाणी सोडण्यास कंपनीला तात्काळ प्रतिबंध करावे, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली.दोन वर्षांपूर्वी रॅडिको डिस्टिलरीजच्या दुर्गंधीयुक्त पाण्याविरुद्ध ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यावेळी आपली कंपनी स्वत:हून बंद करावी, असे आदेश रॅडिको डिस्टिलरीजच्या व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते.कंपनी बंद केली नाही, तर कंपनीविरुद्ध जलकायद्यानुसार कारवाई केली जाईल, तसेच कंपनीला केला जाणारा वीज पुरवठाही बंद करण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता. दरम्यान, महिनाभरासाठीच कंपनी बंद केली. मात्र, कंपनीने ‘ट्रिटमेंट प्लाँट’ सुरू केल्यानंतर उत्पादन प्रक्रिया पूर्ववत झाली. प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून घातक रसायनयुक्त पाण्याचे शुद्धीकरण केले जात होते; परंतु ऐन पावसाळ्यात कंपनीद्वारे रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया न करताच ते मोठ्या प्रमाणात नाल्यामध्ये सोडून देण्यात आले. यंदाही कंपनीने दूषित लाल रंगाचे पाणी मोठ्या प्रमाणात नाल्यामध्ये सोडून दिल्यामुळे कुंभेफळ गाव व लगतच्या दहा ते पंधरा गावांमध्ये हे पाणी शिरले असून नागरिकांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. जवळपास २० ते २४ नागरिकांना ‘पोलिओ’ सारख्या रोगाची बाधा झाली आहे. हे पाणी पिल्यामुळे अनेक जनावरे मरण पावली आहेत. दुर्गंधीयुक्त वास आणि घातक लाल रंगाच्या रसायनयुक्त पाण्यामुळे कुंभेफळ आणि लगतच्या गावांतील नागरिक तसेच जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.कुंभेफळ व लगतच्या शिवारातील विहिरी, हातपंप, तलावांमध्ये घातक रसायनयुक्त लालरंगाचे पाणी आले आहे. कुंभेफळ गावाला औद्योगिक परिसराने पिण्याच्या पाण्याची सुविधा दिली असली, तरी जनावरांना मात्र विहिरी किंवा नदी-नाल्याच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.सदरील कंपनीला तात्काळ प्रतिबंधित करावे, अशी मागणी सुधीर मुळे, ज्ञानेश्वर शेळके, बंडू शेळके, दादाराव शेळके, अशोक भावले, बाळू गोजे, शोभा गोजे, प्रल्हाद गावडे, कल्याण कुबेर, भाऊराव शिंदे, कैलास कैलकर आदी नागरिकांनी केलीआहे.