सिद्धेश्वर महाराज देवस्थानचा होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:04 IST2021-05-28T04:04:07+5:302021-05-28T04:04:07+5:30
सिल्लोड : तालुक्यातील अवघ्या मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या धोत्रा येथील श्रीक्षेत्र सिद्धेश्वर महाराज देवस्थान आणि परिसराचा विकास ...

सिद्धेश्वर महाराज देवस्थानचा होणार कायापालट
सिल्लोड : तालुक्यातील अवघ्या मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या धोत्रा येथील श्रीक्षेत्र सिद्धेश्वर महाराज देवस्थान आणि परिसराचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या देवस्थानाचा कायापालट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देवस्थानाच्या विकासासाठी दोन कोटींच्या निधीला विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यास परवानगी दिली आहे.
गेल्या अधिवेशनात या देवस्थानाचा ‘ब’ वर्गाच्या तीर्थक्षेत्रात समावेश झाला. यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी परिश्रम घेतले. श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थान येथे दर्शनासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातून भाविक येतात. त्या प्रमाणात या ठिकाणी सुख-सुविध नाहीत. मात्र आता या देवस्थानाचा कायापालट होणार आहे. या ठिकाणी भाविकांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे भक्त निवास, नवसपूर्तीसाठी किचन शेड, पूजेसाठी शेड, रस्त्यांचा विकास, विद्यूत रोशनाई, स्वच्छतागृह आणि परिसरात बगीच्या आदी मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत.
कोट......
माझे स्वप्न पूर्णत्वास आले
मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानाचा विकास व्हावा हे माझे अनेक दिवसापासून चे स्वप्न होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निधी मंजूरीला परवानगी दिल्यानंतर हे स्वप्न पूर्णत्वास येणार असल्याने मी अतिशय समाधानी आहे.
- अब्दुल सत्तार, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री