श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान पोहोचले १ लाख कुटुंबांपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:18 IST2021-02-05T04:18:23+5:302021-02-05T04:18:23+5:30
औरंगाबाद : श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान मागील १५ दिवसात १ लाख १२ हजार कुटुंबांपर्यंत जाऊन ...

श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान पोहोचले १ लाख कुटुंबांपर्यंत
औरंगाबाद : श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान मागील १५ दिवसात १ लाख १२ हजार कुटुंबांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यात विविध समाजांचा प्रतिसाद मिळत आहे. अभियान प्रचार, प्रसारासाठी व्याख्यान, कीर्तन, राम कथा, रथयात्रा, महाआरती आणि स्पर्धाही घेतल्या जात असल्याची माहिती देण्यात आली.
श्रीराम मंदिर निर्मितीसाठी महानिधी संकलन अभियानाअंतर्गत शहरात ३ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. हे अभियान १५ जानेवारीला सुरू झाले असून, १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे.
शहरातील स्मशान जोगी समाजातील ४२ महिला व पुरुषांनी एन् ६ येथील स्मशानभूमीत एकत्र येत निधी समर्पण केले.
शहरातील २००हून अधिक बंगाली सुवर्ण कारागिरांनी एकत्र येऊन निधी समर्पण केला.
चौकट
अभियानात खेळाडूंचा सहभाग
अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीसाठी शहरातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी एकत्र येऊन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय संघटनप्रमुख प्रशांत हरतालकर यांच्याकडे निधी सुपूर्द केला.
फोटो ओळी
जयभवानीनगर येथील महिलांनी श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानात सहभागी होऊन रथयात्रा काढली होती.