गृहपालास कारणे दाखवा नोटीस
By Admin | Updated: February 18, 2015 00:41 IST2015-02-18T00:37:08+5:302015-02-18T00:41:49+5:30
उस्मानाबाद : उमरगा येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील अडचणींकडे कानाडोळा करणाऱ्या गृहपालास समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.

गृहपालास कारणे दाखवा नोटीस
उस्मानाबाद : उमरगा येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील अडचणींकडे कानाडोळा करणाऱ्या गृहपालास समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. वसतिगृहातील समस्या व उणीवांची तात्काळ पूर्तता करुन त्याचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले.
उमरगा येथे ८० विद्यार्थिनी क्षमतेचे शासकीय वसतिगृह आहे. किरायाच्या इमारतीत असलेल्या या वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थिनींना गेल्या काही दिवसांपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आ. ज्ञानराज चौगुले यांनी ९ फेब्रुवारी रोजी या वसतिगृहाला भेट दिली. त्यावेळी मुलींनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. या वसतिगृहाचे अधीक्षक हे नेहमीच गैरहजर असतात. या वसतिगृहात विद्यार्थिनींना राहण्यासाठी जागा अत्यंत अपुरी असून त्यांना विविध गैरसोर्इंचा सामना करावा लागतो. शाासनाने ठरवून दिल्याप्रमाणे दैनंदिन जेवण सुद्धा हे पुरेसे मिळत नाही.
विद्यार्थिनींनी दस्तुरखुद्द आमदार व त्यांच्यासोबत आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच तक्रारींचा पाढा वाचल्यामुळे त्यांनी स्वत: लगेच वसतिगृहाची पाहणी करून पंचनामा केला. तेव्हा विद्यार्थिनींच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळले. शिवाय वसतिगृहातील हजेरीपटातही चुका दिसून आल्या. वसतिगृहात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. त्यानंतर समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी उमरगा येथील गृहपालास कारणे दाखवा नोटीस बजावून उणीवांची तात्काळ पुर्तता करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
वसतिगृहातील मुलींना वेळेवर निर्वाह भत्ता दिला जात नाही. वसतिगृहात अपुरी जागा, पुरेसे जेवणही दिले जात नाही. हजेरी पटामध्ये चुकीच्या नोंदी. शालेय साहित्य कमी वाटणे. रात्रीच्यावेळी महिला वॉचमन नाही. बायोमॅट्रिक यंत्रणा बंद. मुलींची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. सीसीटीव्ही कॅमेरे बंदावस्थेत.