शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

धर्माच्या नावावर देशभर सुरू आहे ‘दुकानदारी’

By admin | Updated: December 13, 2014 00:29 IST

औरंगाबाद : धर्माच्या नावावर देशात काही लोकांनी ‘दुकानदारी’ सुरू केली आहे.

औरंगाबाद : धर्माच्या नावावर देशात काही लोकांनी ‘दुकानदारी’ सुरू केली आहे. त्यांनी धर्माला ‘व्यापार’ बनविले आहे, असा संताप व्यक्त करीत साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, धर्म म्हणजे आत्मशांती आहे, लोक धर्म बदलू शकतात; पण ते आपले पूर्वज, कुळ बदलू शकत नाहीत. विश्व हिंदू परिषद-बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदू संमेलनात त्यांनी आपले विचार मांडले. व्यासपीठावर स्वामी शांतीगिरीजी महाराज, भास्करगिरी महाराज, भन्ते चंद्रबोधीजी, सद्गुरु डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य, धावणी मोहल्ल्यातील गुरुद्वाराचे भाई खडकसिंग महाराज, शनिसाधिका विभाश्रीजी, संतोषमुनी कपाटे, भगवान आनंदगडकर महाराज, आनंदशास्त्रीगिरीजी महाराज, काशीगिरीजी महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती. साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, जातीवाद-संप्रदायवादात हिंदू धर्माची ताकद वाटली गेली आहे. त्यामुळे धर्माची अशी दुर्दशा झाली आहे. सर्व जातिभेदाच्या भिंती तोडून एकजूट झाल्यास हिंदू धर्म प्रबल बनेल. भ्रूणहत्या व गोहत्या ही दोन मोठी पापे देशात घडत आहेत. भगवद्गीता ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ मानण्यास विरोध करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. प्रत्येकाच्या घरात गीता व गोमाता असलीच पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. रामजींच्या कामात विराम नाही, असे म्हणत साध्वींनी घोषणा केली की, ‘अयोध्येत राम मंदिर उभारणार, तेही धुमधडाक्यात.’ यावेळी उपस्थितांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष केला. शांतीगिरी महाराजांच्या वतीने विष्णूगिरी महाराज यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यात अंजनीगड येथे हनुमानाचा जन्म झाला; मात्र हे ठिकाण दुर्लक्षित आहे. त्याच्या विकासासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मानवाचा धर्म मानवता आहे. मन:शुद्धीसाठी अंत:करणातील मत्सर, मोह, द्वेषाचे दहन करा, असे आवाहन भन्ते चंद्रबोधी यांनी केले. हिंदू धर्माची संस्कृती दया आहे. तुम्ही सर्व देव बना, दैवी गुणांचे संपादन करा, असे विचार डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य यांनी मांडले. प्रारंभी विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विनायकराव देशपांडे यांनी दिली. या संमेलनासाठी जिल्ह्यातील विविध भागांतून भाविक कडा आॅफिसच्या मैदानावर आले होते.