शहागंजमधील दुकान फोडले

By Admin | Updated: October 19, 2014 00:40 IST2014-10-19T00:24:57+5:302014-10-19T00:40:29+5:30

औरंगाबाद : शहागंज परिसरातील एक दुकान फोडून चोरट्यांनी तेथून सुमारे ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली.

Shop shop in Shahaganj | शहागंजमधील दुकान फोडले

शहागंजमधील दुकान फोडले

औरंगाबाद : शहागंज परिसरातील एक दुकान फोडून चोरट्यांनी तेथून सुमारे ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली.
शहाबाजार येथील रहिवासी मोहंमद युसूफ मोहंमद इस्माईल यांचे शहागंज भागात ‘सुपर बूट हाऊस’ नावाचे दुकान आहे.
मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील १७ हजार रुपये रोख रक्कम व लॅपटॉप, असा सुमारे ३५ हजारांचा ऐवज चोरून नेला. या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Shop shop in Shahaganj