शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

चॉकलेट-बिस्कीटचे आमिष देऊन शाळकरी मुलींवर दुकानदाराचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 3:17 PM

आरोपीला चिकलठाणा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ठळक मुद्दे६० वर्षीय वृद्धाने केले शारीरिक अत्याचारशाळेजवळच आरोपीचे किराणा दुकान आहे.

औरंगाबाद : शहरालगतच्या एका गाव शिवारातील रहिवासी ८ आणि ११ वर्षीय शाळकरी मुलींना चॉकलेट, बिस्किट आणि सॉक्स देण्याचे आमिष दाखवून ६० वर्षीय वृद्धाने शारीरिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि. १७) दुपारी समोर आली. माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या.

बाबूराव चौधरी बाबा (६०) असे आरोपीचे नाव आहे. शहरालगतच्या एका गावातील  ८ वर्षीय पीडितेचे वडील सालगडी आहेत. त्यांच्या शेजारीच पीडितेची ११ वर्षीय मैत्रीण, मजूर आई-वडिलांसह राहते. दोघी जवळच्या जिल्हा परिषदेत शाळेत अनुक्रमे तिसरी आणि पाचवीमध्ये आहेत.  ८ वर्षीय पीडितेचे वडील दोन्ही मुलींना शाळेत नेऊन सोडतात व शक्य असेल, तर ते त्यांना शाळेतून आणण्यासाठीही जातात. त्यांना काम असते तेव्हा दोघी पायी शाळेत जातात व येतात. शाळेजवळच आरोपी चौधरीचे किराणा दुकान आहे. या दुकानात शाळेतील अनेक मुले, मुली चॉकलेटसह, अन्य वस्तू घेण्यासाठी जातात. आरोपीची दोन्ही मुलींवर वाईट नजर पडली होती. शनिवारी दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यानंतर दोघी शाळेतून घरी निघाल्या तेव्हा चौधरीने आवाज देऊन त्यांना बोलावून घेतले. चॉकलेट, बिस्कीट दिले. यानंतर तो त्यांच्या अंगावरील कपडे काढू लागला. घाबरलेल्या दोन्ही मुली रडू लागल्या. तेव्हा त्याने त्यांना मारून टाकीन, अशी धमकी देत शांत केले. त्याने दोघींवर अत्याचार केला.  या आघातामुळे  प्रचंड घाबरलेल्या पीडिता घरी गेल्या. मात्र, याविषयी त्यांनी आई-वडिलांकडे वाच्यता केली नाही. 

...अन् दोघीही रडू लागल्याशनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे आई-वडिलांनी ८ वर्षीय मुलीला शाळेत जाण्यासाठी तयार केले. नेहमीप्रमाणे ती पाठीवर दप्तर घेऊन तिच्या ११ वर्षीय मैत्रिणीच्या घरी गेली. तेव्हा दोघीही मैत्रिणी रडू लागल्या आणि शाळेत जायचे नाही, असे म्हणू लागल्या. यामुळे मोठ्या मुलीच्या आईने त्यांना विश्वासात घेऊन विचारल्यानंतर त्यांनी नराधम दुकानदार चौधरीबाबाच्या कृत्याची माहिती दिली. एवढेच नव्हे तर त्याने यापूर्वीही शेतात आणि त्याच्या घरात असे कृत्य केल्याचे सांगितले.

चाईल्ड लाईनच्या मदतीने गाठले ठाणेदोघींना घेऊन त्यांचे पालक शाळेत गेले. शाळा प्रशासन, शिक्षिकांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर चाईल्ड लाईनच्या मदतीने चिकलठाणा पोलीस ठाणे गाठले. सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे आणि कर्मचाऱ्यांनी झटपट कारवाई करीत नराधम आरोपी बाबूराव चौधरीला बेड्या ठोकल्या.