शहरं
Join us  
Trending Stories
1
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
2
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
3
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
4
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
5
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
6
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
7
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
8
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
9
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
10
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
11
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
12
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
13
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
14
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
15
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
16
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
17
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
18
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
19
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
20
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अदालत रोडवर भर दिवसा अज्ञात टवाळखोरांचा तरुणावर नाहक प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:55 IST

रात्री उज्जैनला जाण्याचे होते नियोजन; तरुण गंभीर जखमी, घाटीत उपचार सुरू

छत्रपती संभाजीनगर : उज्जैनला जाण्यासाठी शहरात आलेले दोन तरुण रस्त्याने नातेवाइकांकडे पायी जात होते. दोन नशेखोरांनी त्यांच्यावर नाहक हल्ला करून गंभीर जखमी केले. सोमवारी दुपारी २:३० वाजता अदालत रोडवरील पगारीया बजाज शोरूमसमोर ही घटना घडली. यात गौरव संजय मावस (२३, रा. मांगेगाव, ता. गंगापूर) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

जखमी गौरव व विजय साळुंके यांचे सोमवारी न्यायालय परिसरात एक काम होते. शिवाय, रात्री त्यांना शहरातून उज्जैनलादेखील निघायचे होते. सोमवारी दुपारी २:३० वाजता भगवान महावीर चौकात उतरून ते सतीश मोटर्सच्या दिशेेने पायी निघाले. पगारीया बजाज शोरूमच्या समोरून पायी जात असताना अचानक त्यांच्यावर हल्ला झाला. टवाळखोरांनी चाकू काढून गौरवच्या पोट व छातीत खोलवर खुपसला. यात गौरव क्षणार्धात रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळून बेशुद्ध पडला. त्याला रुग्णवाहिकेद्वारे घाटीत दाखल करण्यात आले. रात्री उशिरा याप्रकरणी दोन अज्ञातांवर क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नशेखोरांकडून हल्ल्याचा संशयभर दिवसा झालेल्या हल्ल्याच्या घटनेने पोलिसही हैराण झाले. क्रांतीचौक, वेदांतनगर पोलिसांसह गुन्हे शाखेने धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, हा प्रकार नशेखोरांकडूनच झाल्याचा दाट संशय पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. एका हल्लेखोराने काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. त्याची उंची ५.६ फूट होती. तर दुसऱ्या कुरळे केसाच्या हल्लेखोराने टी-शर्ट परिधान केला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Aurangabad: Youth Attacked in Broad Daylight on Adalat Road

Web Summary : Two men, visiting Aurangabad, were attacked on Adalat Road. One, identified as Gaurav Mavas, was seriously injured and is in critical condition. Police suspect the assailants were intoxicated and are investigating via CCTV footage.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी