धक्कादायक ! शिवसेना नगरसेविकेचा महापालिका सभागृहात आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 16:11 IST2019-09-11T16:08:56+5:302019-09-11T16:11:18+5:30
सभागृहात डोके आपटून केला आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक ! शिवसेना नगरसेविकेचा महापालिका सभागृहात आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद : महापालिकेतील मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे महिला नगर सेविकांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करत पुंडलिक नगर वार्डाच्या शिवसेना नगरसेविका वीणा गायके यांनी आज दुपारी ३.४५ वाजता महापालिका सर्वसाधारण सभेत भिंतीवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर गायके लगेच भोवळ येऊन सभागृहात कोसळल्या. या घटनेमुळे महापलिकेत एकच खळबळ उडाली आहे.
तत्पूर्वी केंद्रे यांना कार्यमुक्त करावे परत शासनाकडे पाठविण्यात यावे या मुद्द्यावर सर्पक्षीय नगरसेवक चर्चा करत होते.शेवटी बहुमताने केंद्रे यांना चौकशीसह कार्यमुक्त करण्याचा ठरवा मंजूर झाला.
(सविस्तरवृत्त लवकरच )