शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या वसाहतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन पोलिस पत्नीने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:02 IST

कौटुंबिक छळामुळे मुलीने आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल करण्यासाठी बेगमपुरा पोलिस ठाण्यात ठिय्या

छत्रपती संभाजीनगर : पोलिस आयुक्तालयातील पोलिस वसाहतीत राहणारे पोलिस कर्मचारी समीर शेख यांची पत्नी सबा समीर शेख (वय अंदाजे २२) यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी ०३:०० वाजता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

मूळ निफाड तालुक्यातील कसबे सुकेने गावातील शेतकरी कुटुंबातील सबाचा अडीच वर्षांपूर्वी समीरसोबत विवाह झाला होता. जिन्सी ठाण्यात कार्यरत समीर खेळाडू म्हणून पोलिस मुख्यालयाला संलग्न आहे. पोलिस वसाहतीमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पत्नीसोबत राहत होता. बुधवारी सकाळी ११:०० वाजता सबाच्या माहेरच्यांना समीरने संपर्क करून तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्याच्या काही वेळात पुन्हा कॉल करून सबाला चक्कर आली असून, रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. ही बाब कळताच सबाचे काका अनिस नवाब शेख यांनी नातेवाइकांसह शहरात धाव घेतली. मात्र, त्यांना थेट सबाचा मृतदेहच दाखवण्यात आला. घटनेची माहिती कळताच बेगमपुरा पोलिसांनी धाव घेतली. गुरुवारी दुपारी घडलेल्या घटनेत रात्री उशिरापर्यंत सबाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले नव्हते.

मोबाइल वापरण्यासदेखील होती मनाईपोलिसांच्या माहितीनुसार, सबा यांचा थेट जमिनीवर गंभीर जखमी अवस्थेत मृतदेह आढळला. तिच्या माहेरच्यांनी समीरच्या छळामुळेच तिने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप केला. तिचे काका अनिस यांनी केलेल्या आरोपानुसार, सततच्या मानसिक, शारीरिक छळामुळे सबा माहेरी आली होती; परंतु ज्येष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर सबा पुन्हा पतीसह राहत होती. अनेकदा तिला माहेरच्यांसोबत बोलू दिले जात नव्हते. त्यामुळेच तणावाखाली जाऊन तिने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

रात्री ठाण्यात ठिय्यासबाच्या आत्महत्येमुळे माहेरच्या संतप्त कुटुंबीयांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत समीरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यांची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Police Wife Commits Suicide by Jumping from Building in Colony

Web Summary : A police officer's wife in Chhatrapati Sambhajinagar tragically ended her life by jumping from the third floor of her residence. Family alleges harassment as a possible motive, prompting a police investigation and family protests.
टॅग्स :Policeपोलिसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर