शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

धक्कादायक! मायलेकीने एकाच वेळी विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 16:02 IST

याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

गल्लेबोरगाव (छत्रपती संभाजीनगर) : खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील दुधारे वस्तीवर मायलेकीची विहिरीत उडी घेऊन, आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि ५) रोजी सकाळी सहा वाजता  उघडकीस आली आहे. वंदना भरत दुधारे  (३५) व मुलगी पल्लवी भरत दुधारे (१८) अशी मृत मायलेकीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

शेतकरी भरत भिकन दुधारे यांची गल्लेबोरगाव आखातवाडा रोडवरील दुधारे वस्तीवर शेती आहे. येथेच शेतवस्तीवरच दुधारे कुटुंबासह राहतात. शेतातील विहिरीमध्ये रात्री उशिरा वंदना आणि मुलगी पल्लवी यांनी उडी मारल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज सकाळी वंदना यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला. ग्रामस्थांनी शोध घेतला असता काही वेळाने मुलगी पल्लवीचा देखील मृतदेह विहिरीच्या तळाशी सापडला. दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी वेरूळ येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आली आहेत. दोघींच्या एकाच वेळी जीवन संपविण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या घटनेची वार्ता समजताच गावकऱ्यांना धक्काबसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी