शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

धक्कादायक! आमदार सत्तारांची मुलगी TET परीक्षेत अपात्र, मात्र २०१७ पासून पगार होता सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:27 IST

टीईटी घोटाळ्यात समाविष्ट उमेदवारांच्या नावांच्या यादीत माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे नाव असल्याची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

- अमेय पाठकऔरंगाबाद: माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांचे नाव टीईटी घोटाळ्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावर खुलासा करण्याचा प्रयत्न सत्तार यांनी केला आहे मात्र अपात्र असूनही त्यांच्या मुलीने पगार उचल्याचे उघडकीस आले आहे.  हीना कौसर अब्दुल सत्तार शेख यांना २०१७ पासून आजतागायात पगार मिळत असल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आल्याने या प्रकरणाचा गुंता आता वाढत जात आहे. 

हीना कौसर अब्दुल सत्तार शेख या टीईटी परीक्षेत अपात्र आहेत असा खुलासा स्वतः अब्दुल सत्तार यांनी केला आहे. असे असतानाही २०१७ पासून त्यांना पगार कसा काय सुरु होता ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. या संदर्भात आता एक वेगळी चौकशी करण्याची गरज आहे. कारण शिक्षण विभागांच्या कागदपत्रांनुसार २०१७ पासून ते जुलै २०२२ या महिन्यापर्यंत हिना कौसर अब्दुल सत्तार शेख यांनी पगार उचलला आहे. त्यांना महिना ४०००० पेक्षा जास्त पगार असल्याचीही माहिती आहे. 

दरम्यान, टीईटी घोटाळ्यात समाविष्ट उमेदवारांच्या नावांच्या यादीत माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे नाव असल्याची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर खुद्द सत्तार यांनीच त्यांची मुलगी  टीईटी अपात्र असल्याचं सुरुवातीला माध्यमांना सांगत त्याचे पत्र दिलं. यामुळे जर त्या अपात्र होत्या तर मग त्या पगार कुठल्या निकषावर उचलतात हाही प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे. 

तर शाळेने वेतन बिल सादर केलं त्यात त्या पूर्णतः पात्र असल्याचं दिसतंय आणि म्हणून त्यांचा पगार सुरू असल्याचा खुलासा यावेळी शिक्षण विभागाने केला. शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पात्रता निकष पडताळणी केली जाते त्यानुसार आमच्या कार्यालयातून पगार पत्रक निघतात असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

२०१४ ला झाल्या रुजू दरम्यान, शिक्षकांसाठी टीईटी २०१३ ला आवश्यक करण्यात आली. हीना कौशर अब्दुल सत्तार शेख या २०१४ मध्ये सिल्लोडमधील नॅशनल उर्दू प्राथमिक स्कुलमध्ये रुजू झाल्या. हीना कौशर यांना १-१०-२०१४ पासून तीन वर्षासाठी शिक्षण सेवक म्हणून प्रथम मान्यता मिळाली. शिक्षणाधिकारी कार्यालयाने १६-५-२०१५ ला मान्यता दिली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून पुन्हा तीन वर्षांसाठी ३१-१०-२०१७ ला मान्यता दिली. मात्र, ११-१-२०२२ ला शिक्षण विभागाने पुणे कार्यालयास पाठवलेल्या पत्रात यांचा समावेश करण्यात आला नाही. 

अपात्र असतानाही पगार हीना यांना २०१७ पासून ४० हजार पासून पगार सुरु झाला. अल्पसंख्याक शाळेला २०१८ ला टीईटी आवश्यक केली. त्यानंतर २०२० मध्ये झालेल्या टीईटीमध्ये हीना अपात्र ठरल्या आहेत. मात्र, जुलै २०२२ पर्यंत हीना यांनी पगार घेतला. सध्या त्यांना ५५ हजार रुपये पगार आहे, अशी माहिती वेतन अधीक्षक दिलीप जेऊळकर यांनी दिली.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तारEducation Sectorशिक्षण क्षेत्र