शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरात बॉम्बे मार्केटच्या औषधींचा व्यवसाय दरवर्षी ३०० कोटींपर्यंत

By मुजीब देवणीकर | Updated: December 11, 2024 19:46 IST

रुग्णांच्या जिवाशी खेळ: कोणाचा विश्वास बसणार नाही, असे मोठमोठे डॉक्टरही या व्यवसायाला पाठबळ देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय क्षेत्रात बॉम्बे मार्केटच्या (बीएम) औषधींचा व्यवसाय झपाट्याने वाढतोय. काही वर्षांपूर्वी शहरात मोजक्याच तीन दुकानांमध्ये सी ग्रेडची औषधी विक्रीला उपलब्ध होती. आता शहरातील तब्बल १०० पेक्षा अधिक काऊंटरवर धूमधडाक्यात सुरू आहे. बीएम मार्केटचा व्यवसाय दरवर्षी ३०० कोटींपर्यंत पोहोचला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. कोणाचा विश्वास बसणार नाही, असे मोठमोठे डॉक्टरही या व्यवसायाला पाठबळ देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

वैद्यकीय क्षेत्रात अनेक दशकांपासून काम करणाऱ्या मंडळींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बाजारात तीन प्रकारच्या औषधी उपलब्ध आहेत. याची वर्गवारी ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ अशी करता येईल. ‘ए’ या प्रकारात देशातील, जगभरातील नावाजलेल्या कंपन्या औषधींची निर्मिती आणि विक्री करतात. त्यासाठी संशोधन, औषधींची निर्मिती, पॅकिंगची गुणवत्ता सर्वच बाबींवर बारीक लक्ष दिले जाते. ‘बी’ प्रवर्गात जेनेरिक औषधींसाठीही तेवढेच प्रयत्न होतात. ‘सी’ या प्रवर्गात सर्वांत मोठा घोळ आहे. प्रत्येक औषध अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगीनेच विक्रीला बाजारात येते. सी प्रकारात औषधीसाठी वापरलेले मटेरियल निकृष्ट दर्जाचे, पॅकेजिंगकडे लक्ष नाही, काही दिवसांतच औषधींचा भुसा होतो. हे औषध घेतल्यानंतर रुग्णाला कोणताही फायदा होत नाही, उलट नुकसानच होते.

८० टक्के डिस्काऊंटसी ग्रेडची औषधी विकण्याची स्पर्धा झपाट्याने वाढू लागली. काही औषधी विक्रेते ८० टक्यांपर्यंत डिस्काऊंट देत आहेत. मुळात ‘बीएम’ औषधी तयार करताना खर्च नाममात्र असतो. त्यावर पाहिजे तसे लेबल, एमआरपी टाकून विकले जाते. शहरातील काही डॉक्टर या उद्योगाला खतपाणी घालत असल्याचे समोर आले आहे.

हॉस्पिटल आणि काउंटरशहरातील काही डॉक्टर आणि तेथील मेडिकल शॉपचालकाला या बोगस औषधी कंपन्यांनी हाताशी धरले आहे. डॉक्टरच्या सांगण्यावरून स्वत:चे नाव टाकूनही औषधीचे ब्रँड तयार करून देण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. डॉक्टरने लिहून दिलेली औषधी विशिष्ट दुकानाशिवाय दुसरीकडे कुठेही मिळत नाही. याचा अर्थ असा की, संबंधित औषधी १०० टक्के बॉम्बे मार्केटची असणार आहे.

गुगलवर औषधीचे नावच येत नाहीएखाद्या औषधीचे गुगलवर नावच येत नसेल तर ९९ टक्के औषधी बोगस असावी, असे गृहीत धरावे. नामांकित कंपन्या आपल्या उत्पादनावर क्यूआर कोड, बारकोड देतात. ते स्कॅन केले तर औषधीचा संपूर्ण तपशील आपोआप प्राप्त होतो. बॉम्बे मार्केटच्या औषधींवर असे काहीच नसते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

एफडीएकडून तपासणी का नाही?अन्न व औषध प्रशासनाकडून अधूनमधून विविध दुकानांवरील औषधींचे सॅम्पल जमा केले जातात. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्याचा अहवाल आल्यावर शासनाकडून त्या औषधींच्या विक्रीवर निर्बंध घातले जातात. अलीकडेच शासनाने ६०० कंपन्यांवर बंदी घातली. एफडीएचे कर्मचारी एखाद्या दुकानात गेले तरी पाच ते दहा सॅम्पल जमा करतात. दुकानात किमान एक हजार कंपन्यांचे प्रॉडक्ट् ठेवलेले असतात. त्यातील बोगस तपासणी करणे शक्य नसते. जप्त केलेले सॅम्पल कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून प्रयोगशाळेत पाठवावे लागते. एवढ्या सुविधा एफडीएकडे नाहीत, असेही जाणकारांनी सांगितले.

टॅग्स :medicineऔषधंchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर