धक्कादायक ! कन्नड तालुक्यातील शेतशिवारात मृत बिबट्या आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 10:23 IST2020-09-11T10:23:22+5:302020-09-11T10:23:49+5:30
विजेचा धक्का बसून बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पथकाने व्यक्त केला आहे.

धक्कादायक ! कन्नड तालुक्यातील शेतशिवारात मृत बिबट्या आढळला
कन्नड -तालुक्यातील जैतखेडा शिवारातील भिवसन विश्राम नलावडे यांच्या शेत शिवारात ( गट क्रमांक १२७) गुरुवारी मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळुन आला. वन विभागाचे अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मृत मादी बिबट्याचे सर्व अवयव शाबूत होते. विजेचा धक्का (शॉक) लागून बिबट्याचा मृत्यू झाला असावा. असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. असे उपस्थित तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने कळविले आहे.
यावेळी वनपरिमंडळ अधिकारी एस.पी.कादी, प्रवीण कोळी, जि. एन. घुगे यांचेसह क्षेत्रीय वनरक्षक राम जाधव, सचिन काकुळते,एम. ए.शेख , हजर होते. याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी डब्ल्यू. ए. सय्यद हे पुढील तपास करीत आहेत.