शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतात कापूस वेचण्यास जाणाऱ्या महिलेस लुटले, चोरट्यांनी कर्णफुले ओरबाडल्याने महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:55 IST

पैठण तालुक्यातील घटना, कुटुंबीय येईपर्यंत चोरटे पसार

दावरवाडी: शेतात कपाशी वेचण्यासाठी जाणाऱ्या एका महिलेला दोन चोरट्यांनी निर्जनस्थळी गाठून जीवे मारण्याची धमकी देत अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून नेल्याची घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी-सोनवाडी मार्गावर बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. यावेळी चोरट्यांनी सदरील महिलेची कर्णफुले ओरबाडल्याने ती जखमी झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, दावरवाडी येथील महिला शेतकरी शारदाबाई भरत मोरे (वय ३५ वर्षे) या बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास दावरवाडी-सोनवाडी रस्त्याने शेतात कापूस वेचण्यासाठी जात होत्या. बुधवारी गावात आठवडी बाजार असल्याने या मार्गावर वर्दळ कमी होती. ही संधी साधून या रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात लपून बसलेले अंदाजे ३० वर्षे वयातील २ चोरटे अचानक शारदाबाई मोरे यांच्या समोर आले. त्यांनी शारदाबाई यांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावरील सोन्याचे दागिने काढून देण्याची मागणी केली. त्यामुळे भीतीने शारदाबाई यांनी गळ्यातील सोन्याची पोत, कानातील कुडके व डाव्या कानातील कर्णफुल काढून दिले. यावेळी या मार्गावर वाटसरू येत असल्याची चाहूल लागताच त्यातील एकाने शारदाबाई यांच्या उजव्या कानातील कर्णफुले जोराने ओरबाडून घेत दावरवाडीकडे पोबारा केला. त्यामुळे त्यांच्या उजव्या कानाचा खालचा भाग तुटल्याने त्या जखमी झाल्या.

कुटुंबीय येईपर्यंत चोरटे पसारशारदाबाई मोरे यांनी या घटनेची माहिती फोनवरुन कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबातील सदस्य व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. शारदाबाई यांच्यावर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित, उपनिरीक्षक राम बारहाते, पोलिस पाटील एकनाथ काशिद यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक राम बारहाते करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman robbed while going to farm; earrings snatched, injured.

Web Summary : A woman going to pick cotton in Daurwadi was robbed by two thieves who threatened her, snatched her gold jewelry and earrings, injuring her ear. Police are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर