धक्कादायक ! औरंगाबादमध्ये कोरोनामुळे ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; आतापर्यंत २७ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 09:23 IST2020-05-17T09:23:16+5:302020-05-17T09:23:46+5:30
प्रकृती चिंताजनक असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते

धक्कादायक ! औरंगाबादमध्ये कोरोनामुळे ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; आतापर्यंत २७ बळी
औरंगाबाद : जलाल कॉलनी येथील ३२ वर्षीय कोरोनाबधित व्यक्तीचा शनिवारी (दि. १६) रात्री नऊ वाजता मृत्यू झाला. हा कोरोनाचा २७ वा मृत्यू ठरला.
जलाल कॉलनी येथील ३२ वर्षीय व्यक्तीला शुक्रवारी रात्री ११ वाजता अपघात विभागात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. शनिवारी त्याचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. भरतीवेळी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ७५टक्के होते. दरम्यान शनिवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.