शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या राम-लक्ष्मणामध्ये महाभारत!

By admin | Updated: November 6, 2014 01:37 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातून माजी आ. प्रदीप जैस्वाल यांचा पराभव झाल्यामुळे आज मध्यवर्ती प्रचार कार्यालयातील चिंतन बैठकीत त्याचे जोरदार पडसाद उमटले.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातून माजी आ. प्रदीप जैस्वाल यांचा पराभव झाल्यामुळे आज मध्यवर्ती प्रचार कार्यालयातील चिंतन बैठकीत त्याचे जोरदार पडसाद उमटले. शिवसेनेचे राम-लक्ष्मण असलेले खा. चंद्रकांत खैरे आणि आ. प्रदीप जैस्वाल यांच्यातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. जैस्वाल यांनी खा. खैरे यांच्यासह शहरप्रमुख बाळासाहेब थोरात व अन्य पदाधिकाऱ्यांना टीकेचे लक्ष्य केले, तर खा. खैरे यांनीही जैस्वाल यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. संघटना कुठेही कमी पडली नाही. पक्षावर आरोप कशाला करायचा, गेल्यावेळी शिवसेना तुमच्या सोबत होती असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. संघटनेतील अनेक घटकांनी काम न केल्यामुळे पराभव पत्करावा लागल्याचा आरोप जैस्वाल यांनी केला. १० नोव्हेंबर रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पराभवाला जबाबदार असलेल्या यंत्रणेची माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगून टाकले. गंगापूर मतदारसंघाच्या पराभवाचा आढावा गेल्या आठवड्यात घेण्यात आला. त्यामध्ये माजी आ. अण्णासाहेब माने आणि पराभूत उमेदवार अंबादास दानवे समर्थकांत हल्लाबोल झाल्यानंतर मध्य मतदारसंघाच्या बैठकीतही वादळी चर्चा झाली. आ. संदीपान भुमरे, सभागृह नेते किशोर नागरे यांची यावेळी उपस्थिती होती. जैस्वाल म्हणाले, सुरेवाडीतून लोकसभा निवडणुकीत ५ हजार मते मिळतात. विधानसभेला २ हजार मते कसे काय पडतात. तसेच सभागृह नेते नागरे यांच्या वॉर्डातून विधानसभेला २ हजार मते पडतात. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या वॉर्डातील पक्षाचे मताधिक्य जास्त होते. याचा अर्थ संघटनेने काम केले नाही असाच होतो. कुणी कुणाकडून पैसे घेतले हे मला माहिती आहे. ठाकरे यांना त्याची माहिती देणार आहे. शहर प्रगती आघाडीची यंत्रणा कार्यरत ठेवली असती तर पराभव झाला नसता, असेही ते म्हणाले. बैठकीत मध्यच्या पदाधिकाऱ्यांनी पराभव कशामुळे झाला, त्याची कारणे विशद केली.