शिवराज्याभिषेकदिनीच रोवली लोकशाहीची मुहूर्तमेढ
By Admin | Updated: June 7, 2014 00:25 IST2014-06-06T23:31:46+5:302014-06-07T00:25:36+5:30
नांदेड : शिवराज्याभिषेक उत्सव आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असून याच दिवशी लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवल्या गेली, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष एकनाथराव पावडे यांनी केले़

शिवराज्याभिषेकदिनीच रोवली लोकशाहीची मुहूर्तमेढ
नांदेड : शिवराज्याभिषेक उत्सव आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असून याच दिवशी लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवल्या गेली, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष एकनाथराव पावडे यांनी केले़
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने ६ जून रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ पंडितराव पवळे, इंजि़ शिवाजीराजे पाटील, श्यामसुंदर शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या महानगर अध्यक्षा डॉ़ रेखा पाटील गोर्लेगावकर, संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष संकेत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती़
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले़ यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले़ पावडे म्हणाले, बहुजन हृदयसम्राट युवराज छत्रपती संभाजीराजेंच्या प्रयत्नामुळे संपूर्ण देशात ६ जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सवात रूपांतरित झाला़ शिवराज्याभिषेक दिन हा दिवस राष्ट्रीय सन म्हणून साजरा करण्याचा संकल्प बहुजनवादी संघटनानी केल्याचे त्यांनी सांगितले़
छत्रपती शिवाजी महाराज हे ६ जून १६७४ रोजी स्वराज्याचे राजे झाले, त्यांनी अठरापगड जातीतील लोकांना सोबत घेवून राज्य केले, असे विचार मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा़ डॉ़ गणेश शिंदे यांनी व्यक्त केले़ शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यास विविध जाती-धर्मासह इंग्रजांची उपस्थिती, असेही ते म्हणाले़
कार्यक्रमास डॉ़ सोपान क्षीरसागर, डॉ़ एस़ बी़ चव्हाण, गणेश भायेगावकर, गणेश मोरे, श्रीनिवास शेजुळे, सिद्धार्थ मुळे, गणेश पावडे, बळीराम जाधव, मारोती देशमुख, गजानन कहाळेकर, मारूती देशमुख, जयश्री भायेगावकर, सविता पावडे, ज्योती पाटील, शिल्पा भोसले आदींची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन इंजि़ शिवाजीराजे पाटील यांनी तर डॉ़ रेखा पाटील यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)