शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर भुयारी मार्गाचे २५ कोटी पाण्यात; यंत्रणांचे एकमेकांवर आरोप, तज्ज्ञांनी काढले मुर्खात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 19:26 IST

काम सुरू करण्यापूर्वीच पाणी निचऱ्याचे नियोजन हवे होते

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर रेल्वे फाटकावर छोटा उड्डाणपूल बांधावा, ही अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी होती. रेल्वे प्रशासन आणि सा. बां. विभागाने पूल रद्द करून भुयारी मार्गाचे नियोजन केले. २५ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाचे परिणाम शहरवासीयांना भोगावे लागत आहेत. भुयाराचे काम सुरू करतानाच पावसाच्या पाणी निचऱ्याचे नियोजन, आर्थिक तरतूद करावी लागते. त्याच्याशिवाय काम पुढे सरकतच नाही. आता संपूर्ण काम झाल्यावर शासकीय यंत्रणांनी एकमेकांवर आरोप करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा म्हणावा लागेल, अशा शब्दात तज्ज्ञ अभियंत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पावसाचा अभियंत्यांनी अभ्यास केला का?या भागातील काही वर्षांतील पावसाची सर्वोच्च आकडेवारी गृहीत धरूनच स्टॉर्म वॉटरचे नियोजन करावे लागते. एका तासात किती पाऊस पडतो, हे तरी गृहीत धरायला हवे. शिवाजीनगर येथे तज्ज्ञ अभियंत्यांनी अभ्यास केला नाही का? पावसाचे पाणी कुठे न्यायचे हे अधिकाऱ्यांनी अगोदरच ठरवायला हवे होते. झालेले काम अत्यंत चुकीचे आहे. भुयारी मार्गाची उभारणी करताना सांडपाण्याची लाइन कोठून जाणार, हे अगोदर का ठरले नाही? जिथे नियोजन होते तेथे एका रात्रीतून जलवाहिनी, विजेची केबल आली का? इतके दिवस अधिकारी काय करीत होते, असे मत मनपातील निवृत्त शहर अभियंता सी. एस. सोनी यांनी व्यक्त केले.

उड्डाणपूल का रद्द केला?येथे अगोदर छोटा पूल उभारावा, अशी मागणी होती. पण शिवाजीनगर ते देवळाई चाैक लांबी खूप कमी, असा मुद्दा निघाला. वास्तविक पाहता पूल बांधला असता तर आज मोठी वाहने गेली असती, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता, मनपाला सहा कोटी खर्च करून भूसंपादन करावे लागले नसते. मुळात भुयारी मार्गही अत्यंत कमी जागेत उभारला. पावसाचे पाणी नेण्यासाठी जागाच शिल्लक नाही. प्रकल्पाचा आराखडा तयार करताना या बारीक गोष्टींचे नियोजन असते. तज्ज्ञ अभियंते तेव्हा झोपा काढत होते का? आज आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नागरिकांना त्रास होतोय त्याचे काय? असा सवाल मनपाचे निवृत्त शहर अभियंता एम. डी. सोनवणे यांनी केला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडी