शिवाजी बनकर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
By Admin | Updated: September 15, 2014 00:41 IST2014-09-15T00:40:07+5:302014-09-15T00:41:42+5:30
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवाजी बनकर यांची आज हकालपट्टी करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

शिवाजी बनकर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवाजी बनकर यांची आज हकालपट्टी करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. पक्षविरोधात वक्तव्ये केल्यामुळे त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने ही कारवाई करण्यात आली आहे.
सोनवणे यांनी पत्रकात म्हटले आहे की, बनकर यांच्याकडे प्रदेश किंवा जिल्हा राकाँपचे कुठलेही अधिकृत पद नसताना त्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांची व जनतेची दिशाभूल केली. पक्षाचा प्रदेश चिटणीस असल्याचे सांगून त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षावर टीका करून पक्षावर निराधार आरोप केले. याची पक्षाने गांभीर्याने दखल घेतली आहे. बनकर हे प्रदेश किंवा जिल्हा कार्यकारिणीत, पक्षकार्यात सक्रिय नसताना आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून पक्षाची बदनामी केली. पक्षाची ध्येयधोरणे झुगारून बंडखोरीची भाषा सुरू केल्याने पक्षातून हकालपट्टी केली.