वडगाव कोल्हाटी येथे शिवा काशीद जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 22:47 IST2019-05-05T22:47:35+5:302019-05-05T22:47:40+5:30
वाळूज महानगर : नाभिक सेवा संघातर्फे रविवारी वडगाव कोल्हाटी येथे नरवीर शिवा काशिद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ...

वडगाव कोल्हाटी येथे शिवा काशीद जयंती उत्साहात
वाळूज महानगर : नाभिक सेवा संघातर्फे रविवारी वडगाव कोल्हाटी येथे नरवीर शिवा काशिद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांची पन्हाळगडावरुन सुटका करण्यासाठी स्वत:च्या जिवाचे बलीदान देणारे शिवा काशिद यांच्या जयंतीनिमित्त येथील जिवाजी महाले चौकात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माधव भाले यांच्या हस्ते शिवा काशिद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी भाले यांनी ज्या शूरवीर पराक्रमी मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिले. त्यांचा सन्मान करण्याऐवजी आज विविध ठिकाणी मावळ्याच्या वेशभुषेत तरुण उभे करुन अपमान केला जात आहे. हे थांबविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अक्षय सोनटक्के, अजय प्रधान, माणिक सोनटक्के, गणेश घेवारे, बाळू खटिंग, अजय प्रधान, रघुनाथ बरवे, विजय अवधुते आदींची उपस्थिती होती.