शिवसेनेचा विजयरथ रोखला

By Admin | Updated: May 18, 2014 00:27 IST2014-05-18T00:24:04+5:302014-05-18T00:27:21+5:30

हिं गोली लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचा विजयरथ रोखण्यात काँग्रेसचे आ. विजय खडसे यांना यश आले

Shiv Sena's Vijay Ratha stopped | शिवसेनेचा विजयरथ रोखला

शिवसेनेचा विजयरथ रोखला

 हिं गोली लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचा विजयरथ रोखण्यात काँग्रेसचे आ. विजय खडसे यांना यश आले असून या निवडणुकीमध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. राजीव सातव यांच्या पारड्यात आपली मते टाकून दिलेली निर्णायक लीड त्यांना विजयी करून गेली. २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना तब्बल १५ हजार मतांची आघाडी उमरखेड विधानसभेतून मिळाली होती. सूर्यकांता पाटील यांचे जन्मगाव उमरखेड असतानाही त्यांना येथील मतदारांनी नाकारले होते. माजी मंत्री सूर्यकांता पाटील व माजी खा. अ‍ॅड. शिवाजी माने यांनी थेट बंड पुकारले असले तरी या दोन नेत्यांचा उमरखेड विधानसभा मतदारसंघात कुठलाही प्रभाव दिसून आला नाही. उलट येथील काँग्रेसचे आ. विजय खडसे, माजी अ‍ॅड. अनंतराव देवसरकर व राष्टÑवादीचे माजी आ. प्रकाश पाटील देवसरकर, माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल यांनी मिळून कुठेलेही राजकीय मतभेद न ठेवता जोमाने अ‍ॅड. सातव यांच्या प्रचारासाठी रात्रीचा दिवस करीत कठोर परिश्रम घेतले. त्याचबरोबर काँग्रेस व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनीही उत्साहाने काम केले. यात भर म्हणून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अतिशय महत्वाची भूमिका पार पाडणारे गोपाल अग्रवाल हे गेल्या अनेक निवडणुकीमध्ये भाजपा- शिवसेनेला साथ देत होते; परंतु यावेळी अ‍ॅड. सातव यांच्याशी त्यांची चांगली मैत्र असल्याने त्यांनी सातव यांच्यासाठी जोरदार प्रचार चालविला. त्याचा सातव यांना फायदा झाला. अ‍ॅड. सातव यांना उमरखेड विधानसभ मतदार संघातून १ हजार ४७९ मतांची लीड सातव यांना मिळाली आहे. काँग्रेस- राष्टÑवादीच्या नेत्यांनी आपसातील मतभेद बाजूला सारून आघाडी धर्म पाळीत राजीव सातव यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यामुळेच या मतदार संघातून थोडे का होईना सातव यांना मताधिक्य मिळाले. काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात आघाडीतील मतभेदाचा शिवसेनेने यापूर्वी फायदा घेतला असला तरी यावेळी मात्र सेनेचे या मतदारसंघातील डावपेच फोल ठरले.

Web Title: Shiv Sena's Vijay Ratha stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.