शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

भाजपची भूमिका लक्षात येत नसल्याने शिवसेना अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 4:23 PM

विधानपरिषद निवडणुकीत दगाफटक्याच्या भीतीमुळे जलील, सत्तार यांची मनधरणी 

औरंगाबाद : शिवसेना-भाजपमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीसाठी युती होण्याबाबत अजून साशंकता आहे. केंद्रातील राजकारणामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावल्याने युतीचे गणित जुळेल, अशी शक्यता सध्यातरी नाही. अशा परिस्थितीतच औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीत भाजपचे मतदार नेमके काय करणार, याचा अंदाज येत नाहीय. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीचे खा. इम्तियाज जलील, आ.अब्दुल सत्तार यांच्याकडील मतदान मिळावे, यासाठी आवाहन केले आहे. गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही लोकप्रतिनिधींशी चर्चा करून समीकरण जुळविण्याचा प्रयत्न केला.

भाजपने दोन्ही जिल्ह्यांतील जि. प.तील सत्ता समीकरणाचे हत्यार उपसले आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेली युती तोडावी, अशी भाजपची मागणी आहे. या सुडाच्या राजकारणात भाजप काहीही निर्णय घेऊ शकतो, त्यामुळे शिवसेनेने सर्व बाजूंनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांत संयुक्त बैठक  घेत घोडेबाजार रोखण्यासाठी एकत्रित निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे मतदानासाठी ‘फुल नाही तर फुलाची पाकळी’देखील मतदारांना आता मिळणार नाही, असे बोलले जाऊ लागले आहे. 

एमआयएमच्या मनधरणीवर भाजपचे मतभाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले, भाजप महायुतीचे उमेदवार दानवे यांचा प्रचार करीत आहे. एमआयएमचे सहकार्य घ्या अथवा नका घेऊ, आम्हाला त्याचे काहीही देणे-घेणे नाही. आम्ही आमचे काम करणार, ११ तारखेला १८९ मतदारांची बैठक होणार आहे. त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अतुल सावे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेनेचे मत असेशिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले, भाजपला डिवचण्यासाठी मनधरणी केलेली नाही. निवडणूक आहे, महायुतीकडे बहुमत असले तरी उमेदवारासाठी सर्वांना आवाहन करावेच लागेल. निवडणूक ही निवडणुकीच्या सर्वांगाने पाहावी लागते. त्यानुसारच पालकमंत्र्यांनी मतदानासाठी आवाहन केले आहे. भेट घेतली म्हणजे चूक झाली, असा अर्थ होत नाही. शुक्रवारी मनपात युतीच्या मतदारांची संयुक्त बैठक घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबादJalanaजालना