शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST2021-02-05T04:09:03+5:302021-02-05T04:09:03+5:30
सिल्लोड : महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल सूत गिरणीचे संचालक मारुती वराडे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील ...

शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
सिल्लोड : महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल सूत गिरणीचे संचालक मारुती वराडे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील जळकीघाट येथील शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते शेतकरी संघटनेतील कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नरेंद्र पाटील, मारुती वराडे, विशाल बावस्कर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेत जाहीर प्रवेश करणाऱ्यांमध्ये अजय कावले, मंगेश गोचके, शैलेश कावले, गोकुळ कावले, स्वप्नील शेळके, दत्ता बावस्कर, विशाल गोचके, राजू गोचके, श्रावण अमृते, नंदू कावले, सुरेश जाधव, बंडू गोचके, किशोर कावले, दीपक काकडे, आकाश काकडे, भागवत काकडे, अभिषेक गोचके यांचा समावेश आहे.
(फोटो : उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते शेतकरी संघटनेतील कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. यावेळी सिल्लोड तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.