शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

शिवसेनेने इतिहास घडवला; औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच ६ जागा पटकावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 13:36 IST

आता जिल्ह्याच्या विकासाचे मोठे आव्हान

ठळक मुद्देजिल्ह्यात ३० वर्षांचा इतिहासात जनतेने भरभरून दिले

- विकास राऊत 

औरंगाबाद : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जिल्ह्याच्या ३० वर्षांतील कारकीर्दीत पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पक्षाला नऊपैकी  सहा जागा पटकावता आल्या आहेत. पक्षाच्या दृष्टीने हा इतिहास घडला आहे.  

शिवसेनेची औरंगाबाद जिल्ह्यामधील विधिमंडळातील कारकीर्द सुमारे ३० वर्षांची आहे. १९९० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैठणमधून बबनराव वाघचौरे हे शिवसेनेकडून विजयी झाले,  तर गंगापूरमधून कैलास पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा फडकाविला. ग्रामीण भागात पहिल्यांदाच शिवसेनेला दोन जागा त्यावेळी मिळाल्या. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे हे पहिले आमदार ठरले. जिल्ह्यात त्यावेळी शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले आणि तो त्यावेळचा पक्षाचा इतिहास ठरला. औरंगाबाद पूर्वमधून हरिभाऊ बागडे विजयी झाल्याने युतीच्या ४ जागा झाल्या होत्या. 

१९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैठणमधून संदीपान भुमरे, औरंगाबाद पश्चिममधून चंद्रकांत खैरे या दोनच जागा शिवसेनेला जिंकता आल्या. त्या निवडणुकीत राज्यात युतीचे सरकार आले मात्र गंगापूरची जागा  शिवसेनेला गमवावी लागली. 

१९९९ साली लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या. यात गंगापूर येथून शिवसेनेचे अण्णासाहेब माने, वैजापुरातून आर. एम. वाणी आणि पैठणमधून संदीपान भुमरे हे विजयी झाले. कन्नड आणि औरंगाबाद पश्चिमची जागा शिवसेनेला जिंकता आली नाही. यावेळीही शिवसेनेचे तीनच आमदार होते. 

२००४ सालच्या विधानसभा कुरुक्षेत्रात पैठणमधून भुमरे, गंगापूरमधून माने, वैजापूरमधून वाणी, कन्नडमधून नामदेव पवार विजयी झाले. औरंगाबाद पश्चिम शिवसेनेला जिंकता आले नाही. २००४ ची जिल्ह्यातील शिवसेना आमदारांची संख्या चार होती. 

२००९ साली मतदारसंघ पुनर्रचना झाली.  या निवडणुकीत वैजापूरमधून वाणी आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाट हे दोनच शिवसेनेचे शिलेदार विधानसभेत गेले. पैठण, गंगापूर, औरंगाबाद मध्य, पूर्व, फुलंब्री, सिल्लोड या जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली. पैठणमधून संदीपान भुमरे, औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट, कन्नडमधून हर्षवर्धन जाधव हे विजयी झाले. या वेळची शिवसेना आमदारांची संख्या तीन इतकी होती. 

२०१९ च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या दृष्टीने इतिहास घडला. जिल्ह्यात नऊपैकी सहा जागी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. भाजपचेही तीन आमदार निवडून आल्याने युतीची निर्विवाद सत्ता जिल्ह्यावर निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात शिवसेना ठरला मोठा भाऊ २०१९ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत लढले. पहिल्यांदाच शिवसेनेला सिल्लोडमध्ये यश मिळाले. तेथे भाजपची दावेदारी असताना सेनेने मुसंडी मारून जागा पदरात पाडली. आ.अब्दुल सत्तार विजयी झाले. भाजपच्या  वाट्याला फुलंब्री, औरंगाबाद पूर्व, गंगापूर मतदारसंघ आले. त्या जागा भाजपने जिंकल्या, तर शिवसेनेला कन्नड, वैजापूर, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, पैठण, सिल्लोड या जागांवर शंभर टक्के यश मिळाले. जिल्ह्यात पहिल्यादांच शिवसेना राजकीयदृष्ट्या मोठा भाऊ ठरला आहे. ९ पैकी ९ जागा महायुतीच्या ताब्यात गेल्या आहेत. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019