शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने हिंदुत्व सोडले, त्यांच्या भगव्या झेंड्याचे शुद्धीकरण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 17:22 IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकांना तिलांजली दिली

ठळक मुद्देकॉंग्रेसला जनतेने तर झिडकारले, महाविकास आघाडीतही कुणी इज्जत देताना दिसत नाही''स्वत:ची उंची बघूनच भाजपची उंची मोजा''; जयसिंगराव गायकवाडांना इशारा

औरंगाबाद : शिवसेनेच्या भगव्या झेंड्याच्या शुध्दीकरणाची वेळ आली आहे. त्यांनी हिंदुत्व सोडून दिलेले आहे. त्यांची मनोधारणाच गोऱ्या लोकांच्या कामासारखी आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकांना यांनी तिलांजली दिली आहे, अशी घणाघाती टीका  भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली. शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या वकिलांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आ. आशिष शेलार यांनी यावेळी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला. वीज बिल माफीच्या मुद्द्यावर त्यांनी कॉंग्रेसला टीकेचे लक्ष्य केले .त्यांनी सांगितले की, कॉंग्रेसला जनतेने तर झिडकारले आहेच त्यांना आता महाविकास आघाडीतही कुणी इज्जत देताना दिसत नाही, हे विज बिल माफ करण्याच्या मुद्दयावरून लक्षात येत आहे.

''स्वत:ची उंची बघूनच भाजपची उंची मोजा''; जयसिंगराव गायकवाडांना इशाराशिरीष बोराळकर यांना पक्षाचे तिकीट मिळाल्यानंतर गायकवाड यांनी त्यांना आशीर्वाद द्यायला हवे होते. पक्षात नवीन पिढीला संधी मिळायलाच पाहिजे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपला योग्य तो सन्मान ठेवू असे गायकवाड यांना सांगितले होते. जयसिंगराव गायकवाड यांना भाजपाने उंचीवर नेले. आता ते भाजपबद्दल बदनामीकारक वक्तव्य करीत आहेत. हे त्यांनी वेळीच थांबवले नाही तर आम्ही त्यांना त्यांच्यापेक्षाही भयानक भाषेत उत्तर देऊ. जयसिंगराव गायकवाड यांनी आधी स्वत:ची उंची बघावी मग भाजपची उंची मोजावी असा दम शेलार यांनी दिला. 

सतीश चव्हाण यांच्यावर टीका शिरीष बोराळकर हेच भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. रमेश पोकळे यांनी समजून घ्यावे व भाजपचा उमेदवार हा प्रचार थांबवावा असाइशारा शेलार यांनी पोकळे यांना दिला. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यावर आशिष शेलार यांनी यावेळी टीकेची झोड उठवली. विधान परिषदेत त्यांनी कसलीही चमकदार कामगिरी बजावलेली नाही. शिक्षकांना न्याय दिलेला नाही. मराठा आरक्षणाच्या वेळी कुठे होते ? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, शहराध्यक्ष संजय केणेकर, बापू घडामोडे, अनिल मकरिये आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस