शिवसेनेची ‘स्कील बेस इनकमींग’वर भर : आदित्य ठाकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 14:11 IST2019-08-31T14:10:38+5:302019-08-31T14:11:37+5:30

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर बोलणे टाळले

Shiv Sena focuses on 'skill base incoming': Aditya Thackeray | शिवसेनेची ‘स्कील बेस इनकमींग’वर भर : आदित्य ठाकरे 

शिवसेनेची ‘स्कील बेस इनकमींग’वर भर : आदित्य ठाकरे 

ठळक मुद्देमतदान दिले नाही त्यांचे मत वळविण्याचा प्रयत्न

औरंगाबाद :  आम्ही स्कील बेस इनकमींगवर भर देतोय. भविष्यात पक्षाला राज्याला ज्यांच्यापासून फायदा होईल, त्यांनाच पक्षात प्रवेश देत आहोत असे नमूद करत नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल आपले मत काय या थेट प्रश्नाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बगल दिली.

जनआर्शिवाद यात्रेत जालन्याला जाण्यापूर्वी त्यांनी सकाळी पत्रकारांसोबत संवाद साधला. चार हजार किलोमिटरचा प्रवास अत्तापर्यंत केला आहे. नागरिकांचे गाऱ्हाणे एकूण घेत आहे. लोकसभेत मतदान केल्यामुळे आभार मानत आहे. विरोधात मतदान केले असेल तर त्यांचे मन वळविण्याचा मी प्रयत्न करतोय अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. आपण विधानसभा निवडणूक कोठून लढविणार यावर आदित्य ठाकरे यांनी नमूद केले की, वरळी, दिग्रज, मालेगाव येथून कार्यर्त्यांनी मागणी होत आहे. माझी कर्मभूमी संपुर्ण महाराष्ट्र आहे. जनतेने आदेश दिला तरच मी लढणार आहे.

Web Title: Shiv Sena focuses on 'skill base incoming': Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.