क्रांती चौकात शिवपूजनाने शिवसेनेतर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 11:41 IST2020-03-12T11:36:30+5:302020-03-12T11:41:07+5:30
दुपारी राजबाजार येथील श्री संस्थान गणपती मंदिर येथे महाआरती होणार आहे.

क्रांती चौकात शिवपूजनाने शिवसेनेतर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी
औरंगाबाद : तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे क्रांती चौक येथे गुरुवारी (दि. 12) सकाळी अकरा वाजता शिवपूजन करण्यात आले. मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यानंतर पदाधिकारी शहरातील पुतळ्याचे पूजन करण्यासाठी रवाना झाले. दुपारी राजबाजार येथील श्री संस्थान गणपती मंदिर येथे महाआरती होणार आहे.
गडकिल्ल्याचा देखावा क्रांतिचौकात उभारण्यात आला होता. अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभागृहनेता विकास जैन, पृथ्वीराज पवार, बाळासाहेब थोरात, बंडू ओक, गणू पांडे, विश्वनाथ स्वामी, गोपाळ कुलकर्णी, सुनीता आऊलवार, सुनीता देव,अंजली मांडवकर यांच्यासह पदाधिकारी उपास्थित होते. कोरोना संक्रमण टाळण्यासाठी मिरववणूक रद्द केली आहे. शिवाय गर्दी होणार नाही याची काळजी घेतल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.