खुलताबाद तालुक्यात अनेक ठिकाणी झाली शिवसेना-भाजप युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:06 IST2021-02-09T04:06:51+5:302021-02-09T04:06:51+5:30

खुलताबाद : राज्यभरात शिवसेना-भाजपमध्ये घमासाम लढाई सुरू असताना सोमवारी खुलताबाद तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंचाच्या निवडणुकीत शिवसेना- भाजपने एकत्र येत ...

Shiv Sena-BJP alliance was formed in many places in Khultabad taluka | खुलताबाद तालुक्यात अनेक ठिकाणी झाली शिवसेना-भाजप युती

खुलताबाद तालुक्यात अनेक ठिकाणी झाली शिवसेना-भाजप युती

खुलताबाद : राज्यभरात शिवसेना-भाजपमध्ये घमासाम लढाई सुरू असताना सोमवारी खुलताबाद तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंचाच्या निवडणुकीत शिवसेना- भाजपने एकत्र येत संसार थाटला असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायत निवडणुकी अगोदरही महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असेच राजकारण सुरू होते. मात्र सरपंच व उपसरपंच निवडणुकीसाठी अनेकांनी आपल्या सोयीनुसार युती व आघाडी केली आहे. राज्यपातळीवर शिवसेना-भाजपचे एकमेकाविरुद्ध कट्टर दुश्मनीचे वातावरण असले तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला तिलांजली देत युती करण्यातच धन्यता मानली आहे. तालुक्यातील भडजी- ममनापूर ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे अजय जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे यांनी युतीचे सरपंच, उपसरपंच विराजमान केले आहे. मावसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवडणुकीतही भाजपने शिवसेनेस सहकार्य करीत शिवसेनेचा सरपंच बसविला आहे. मावसाळा हे तालुकाप्रमुख राजू वरकड यांचे गाव आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या राजेश्री अतीष देवगिरीकर या सरपंच बनल्या आहेत. गल्लेबोरगाव ग्रामपंचायतीत शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी एकत्र येत काँग्रेसचे जगन्नाथ खोसरे यांच्या ताब्यातून ग्रामपंचायत हिसकावून घेत सरपंचपदी विशाल खोसरे, तर उपसरपंचपदी रामदास चंद्रटिके बिनविरोध निवडून आले आहेत.

वडोद ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत ९ पैकी ७ सदस्य असलेल्या पॅनलकडे ओबीसी महिला सरपंचपदाचा सदस्य नसल्याने त्यांना सरपंचपद मिळाले नाही. विरोधी गटाच्या दोन सदस्यांपैकी एक ओबीसी महिला सदस्य सुनीता विलास चव्हाण या असताना त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली.

फोटो कॅप्शन : १) वडोद बु. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता विलास चव्हाण या बिनविरोध विजयी झाल्या.

Web Title: Shiv Sena-BJP alliance was formed in many places in Khultabad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.