शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वहीदकाकांच्या अंत्ययात्रेस जनसागर

By admin | Updated: November 28, 2014 01:16 IST

औरंगाबाद : ‘अमारत- ए- शरिया’चे मराठवाडाप्रमुख अब्दुल वहीद खान नक्षबंदी (काका) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

औरंगाबाद : ‘अमारत- ए- शरिया’चे मराठवाडाप्रमुख अब्दुल वहीद खान नक्षबंदी (काका) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेप्रसंगी जनसागर उसळला होता.‘अमारत- ए- शरिया’, हिला कमिटीचे प्रमुख, काझी आदी विविध पदांवर मागील अनेक वर्षांपासून ते काम करीत होते. ८४ वर्षीय काका मागील काही दिवसांपासून आजारी होते. बुधवारी रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला. काल रात्रीपासूनच त्यांच्या रोहिला गल्ली येथील निवासस्थानी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. सकाळी पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्यासह आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काका यांच्या मृतदेहास पुष्पचक्र अर्पण करून सलामी दिली. त्यानंतर शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास काकांचे पार्थिव किलेअर्कमार्गे जामा मशीद येथे आणण्यात आले. प्रत्येक नागरिकास त्यांना ‘खांदा’ देता यावा म्हणून त्यांच्या पार्थिव ठेवलेल्या पिंजऱ्याला मोठमोठे बांबू लावण्यात आले होते.दुपारी जोहरच्या नमाजनंतर शहागंज मशीदचे पेशइमाम मौलाना मुजीब-उल्ला यांनी जनाजाची नमाज पढविली. यावेळी जामा मशीदमध्ये खूप गर्दी झाली होती. पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. जामा मशीदमध्ये परत एकदा शेवटचे दर्शन घेण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर पार्थिव किलेअर्क येथील पंचकुंआ कब्रस्तानात आणण्यात आले. या ठिकाणी दफनविधी करण्यात आला. यावेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, माजी उपमहापौर मुजीब आलम खान, माजी मंत्री गंगाधर गाडे, बाबाजानी दुर्राणी, कदीर मौलाना, डॉ. गफ्फार कादरी, जावेद कुरैशी, शहनवाज खान, संजय जगताप, मुश्ताक अहेमद, एजाज जैदी, अताउल्ला खान, जुल्फेखार शेख, डॉ. मकदूम फारुकी, रशीदमामू, डॉ. जावेद मुकर्रम यांच्यासह डॉक्टर, वकील, राजकीय मंडळी, बोहरी समाजातील नागरिक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध मशिदींचे पेशइमाम, त्याचप्रमाणे सर्व मौलाना उपस्थित होते.