शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

वैजापुरात नगराध्यक्षपदी शिल्पा परदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 1:08 AM

नगरसेवकपदासाठी सेनेला १३, भाजप ९ व काँग्रेसला १ जागा

वैजापूर : येथील नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा दिनेश परदेशी यांनी शिवसेनेच्या उमेदवार सय्यद ताशफा अजहर अली यांचा २०७३ मतांनी दणदणीत पराभव करून सत्ता ताब्यात घेतल्याने नगरपालिकेत ‘कमळ’ फुलले. परदेशी यांना २६,६८७ पैकी १३,९४६ व ताशफा यांना ११,८७३ मते मिळाली.मात्र, नगरपालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक १३ नगरसेवक निवडून आले. भाजपचे ९ व काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला. निकाल जाहीर झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ जाधव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नबी पटेल तिडीकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदीपान सानप व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल डाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहा टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक एक ते सहामधील नगराध्यक्ष व नगरसेवकपदांच्या उमेदवारांची मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर प्रभाग क्रमांक सात ते अकरामधील मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सय्यद ताशफा यांना केवळ २१० मतांची आघाडी मिळाली. मात्र प्रभाग क्रमांक सात ते अकरामध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाली. या सर्व प्रभागात डॉ. दिनेश परदेशी यांचे वर्चस्व असल्याने सेनेला येथील आघाडी तोडणे कठीण झाले. अखेर भाजपच्या शिल्पा परदेशी यांनी १३,९४६ मते मिळवून त्यांच्या प्रतिस्पर्धी सय्यद ताशफा यांचा २०७३ मतांची आघाडी घेऊन पराभव केला. या विजयामुळे नगरपालिकेवर भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे. काँग्रेसचे एकमेव उमेदवार उल्हास ठोंबरे हे प्रभाग क्रमांक १० ब मधून १२५४ मते घेऊन विजयी झाले. या प्रभागात शिवसेनेचे प्रकाश चव्हाण यांना केवळ ६६३ मते मिळाली. नगराध्यक्षपदासाठी ३७५ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. नगराध्यक्षपदाचे अन्य उमेदवार कल्पना लोखंडे (अपक्ष) यांना ६९, सय्यद आफरिन अकबर (एमआयएम) यांना २४६ व रिपाइंच्या सुनीता लाड यांना १७८ मते मिळाली. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ३७५ व नगरसेवकाच्या २३ जागांसाठी तब्बल १२२८ जणांनी ‘नोटा’चा वापर केला.सेनेच्या माजी आमदारपुत्राचा पराभवशिवसेनेचे माजी आमदार आर. एम. वाणी यांचे सुपुत्र सचिन यांचा भाजप उमेदवार शैलेश चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक सात ब मधून १२८ मतांनी पराभव केला.शिवसेनेचे उमेदवार प्रकाश चव्हाण यांना प्रभाग क्रमांक दहा ब मधून काँग्रेसचे उल्हास ठोंबरे यांच्याकडून हार पत्करावी लागली. भाजपचे गोविंद धुमाळ यांना प्रभाग सहामधून शिवसेनेचे शेख इम्रान रशीद यांनी पराभूत केले. राष्ट्रवादीचे जाफर शेख यांना प्रभाग दोनमधून शिवसेनेचे शेख रियाज अकील यांनी पराभूत केले.पती-पत्नी विजयीकाँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले दशरथ बनकर हे प्रभाग क्रमांक ११ ब मधून व त्यांच्या पत्नी माधुरी बनकर या प्रभाग क्रमांक १० अ मधून विजयी झाल्या.पत्नी विजयी, पती पराभूतसेनेच्या प्रीती भोपळे या प्रभाग सात अ मधून विजयी झाल्या तर त्यांचे पती परेश भोपळे हे प्रभाग ११ ब मधून पराभूत झाले.विजयी मिरवणूक रद्ददरम्यान, वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी येथील जवान किरण पोपटराव थोरात हे शहीद झाल्याने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे कुठल्याही विजयी उमेदवाराने मिरवणूक काढली नाही.प्रभाग क्रमांक निहाय विजयी उमेदवार व त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना मिळालेली मते१ अ- सखाहरी लक्ष्मण बर्डे (शिवसेना)-११२९ (विजयी), शेख अब्दुल रऊफ (भाजप)- ५९०१ ब - द्वारकाबाई घाटे (शिवसेना)-१०२८ (विजयी), सीमा कंगले (भाजप)- ६५५२ अ- नंदाबाई त्रिभुवन (शिवसेना)- १४८८ (विजयी), लीलाबाई गरूड (राष्ट्रवादी)- ८१४२ ब - शेख रियाज अकील (शिवसेना)- १६१० (विजयी), शेख जाफर हुसेन (राष्ट्रवादी)- ६९२३ अ - स्वप्नील जेजूरकर (शिवसेना)- ११९० (विजयी), केशव आंबेकर (अपक्ष)-२५९, रतीलाल गायकवाड (भाजप)- १०९९,३ ब -अनिता तांबे (भाजप)- ११४५ (विजयी), दीपाली बोर्डे (शिवसेना)- १०८५, साधना साखरे (अपक्ष)- ३२४४ अ -शोभा विलास भुजबळ (भाजप)- १३३७ (विजयी), पठाण जास्मिन वासीम (एमआयएम)- ८७, इस्माईल नुसरत बेगम (शिवसेना)- १२६८४ ब - नीलेश भाटिया (शिवसेना)- १३८३ (विजयी), सय्यद हिकमत (भाजप)- ११२२, वसीम जहूरखान पठाण (एमआयएम)- १७५५ अ - सुप्रिया व्यवहारे (शिवसेना)- १८४२ (विजयी), अमृता आंबेकर (भाजप)- ११०२५ ब - साबेरखान अमजदखान (शिवसेना)- १८२६ (विजयी), गौरव दोडे (भाजप)- ११२७६ अ - शेख इम्रान रशीद (शिवसेना)- ११६४ (विजयी), गोविंद धुमाळ (भाजप)- १०९७६ ब - ज्योती टेके (शिवसेना)- १४२५ (विजयी), श्रुती टेके (भाजप)- ८३७७ अ - प्रीती परेश भोपळे (शिवसेना)- १७१३ (विजयी), रितू सोनवणे (राष्ट्रवादी)- ११५५७ ब - शैलेश चव्हाण (भाजप)- १४९९ (विजयी), सचिन वाणी (शिवसेना)- १३७१८ अ - गणेश खैरे (भाजप)- १०८० (विजयी), बबन त्रिभुवन (शिवसेना)- ६१३८ ब -लताबाई मगर (भाजप)- ८७६ (विजयी), मनीषा वाणी (शिवसेना)- ६५९, पठाण रियानाबी (अपक्ष)- १०१, सुनीता लाड (रिपाइं)- ५३९ अ - शेख मुमताजबी बिलाल (शिवसेना)- ८१७ (विजयी), शेख कमरून्निस मजीद कुरेशी (भाजप)- ६९४९ ब - प्रकाश चव्हाण (शिवसेना)- ९२७ (विजयी), शेख वसीम शब्बीर (एमआयएम)- ९०, नीतेश शहा (भाजप)- ५१७१० अ - माधुरी बनकर (भाजप)- १३९६ (विजयी), प्रीती भोपळे (शिवसेना)- ७४३१० ब - उल्हास ठोंबरे (काँग्रेस)- १२५४ (विजयी), प्रकाश चव्हाण (शिवसेना)- ६६३, मयुरेश जाधव (राष्ट्रवादी)- २४६११ अ - संगीता गायकवाड (भाजप)- २०१८ (विजयी), मनीषा शिंदे (शिवसेना)- १४१६११ ब - दशरथ बनकर (भाजप)- १९८६ (विजयी), परेश भोपळे (शिवसेना)- १४३८११ क -जयश्री दिनेश राजपूत -(भाजप) (१८०१)(विजयी), कविता जाधव (शिवसेना)- १६३७. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक