२३ व २४ ला शहनाई महोत्सव

By Admin | Updated: August 18, 2014 00:37 IST2014-08-18T00:27:16+5:302014-08-18T00:37:43+5:30

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दि. २३ व २४ आॅगस्ट रोजी तापडिया नाट्य मंदिरात भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान शहनाई संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे

Shehnai Festival on 23rd and 24th | २३ व २४ ला शहनाई महोत्सव

२३ व २४ ला शहनाई महोत्सव

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दि. २३ व २४ आॅगस्ट रोजी तापडिया नाट्य मंदिरात भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान शहनाई संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पं. विश्वनाथ ओक व डॉ. श्रीरंग देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
शहनाईवादक डॉ. प्रमोद गायकवाड- नम्रता गायकवाड, बासरीवादक पं. विवेक सोनार व तबला वादक जगमित्र लिंगाडे यांचे शनिवारी (दि.२३) व कल्याण अपार व इकबाल खान यांची शहनाई व व्हायोलिनची जुगलबंदी आणि प्रल्हाद शेळके यांचे बासरीवादन, पं. विजयकुमार संत-विश्वास संत यांचे सितारवादन रविवारी (दि.२४) होईल.
या सांगीतिक मेजवानीचा लाभ घेण्याचे आवाहन नंदकिशोर कागलीवाल, मुुकुंद भोगले, सचिन मुळे, सुबोध जाधव आदींनी केले आहे.

Web Title: Shehnai Festival on 23rd and 24th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.