ती म्हणतेय हा माझा पती, तो म्हणतोय ही उचापती...; दोघांच्या एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 15:09 IST2018-01-19T15:06:28+5:302018-01-19T15:09:49+5:30
पत्नीच्या शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाने ती आपली पत्नीच नसून तिनेच खोटे दस्तावेज तयार करून पती म्हणून लोकांना सांगत माझी फसवणूक सुरू केल्याची तक्रार पोलिसांना दिली आहे. त्यावरून पुंडलिकनगर पोलिसांनी सदर तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ती म्हणतेय हा माझा पती, तो म्हणतोय ही उचापती...; दोघांच्या एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी
औरंगाबाद : पत्नीच्या शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाने ती आपली पत्नीच नसून तिनेच खोटे दस्तावेज तयार करून पती म्हणून लोकांना सांगत माझी फसवणूक सुरू केल्याची तक्रार पोलिसांना दिली आहे. त्यावरून पुंडलिकनगर पोलिसांनी सदर तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तिच्याशी आपला कायदेशीर अथवा रीतीरिवाजानुसार विवाह झालेला नाही; परंतु तिने तिच्या नावासमोर पती म्हणून माझे नाव लावत पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँकेत खातेसुद्धा उघडल्याचे तक्रारदार अजय चैनसिंग राजपूत (रा. एस.टी. कॉलनी, गजानननगर) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ती अजय माझा पती असल्याचे सर्वत्र सांगत बदनामी करते, असेही तक्रारीत नमूद केले
आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला सीमा (नाव बदलले) हे ऐकमेकांच्या परिचयाचे आहेत. २०११ ते २०१२ दरम्यान तिने ही सर्व कागदपत्रे बनविली आहेत. पोलीस उपनिरीक्षक कापसे तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक एल. ए. सिनगारे यांनी सांगितले की, तक्रारदार आणि आरोपी महिला यांच्यात जुना वाद आहे.या वादातून महिलेच्या तक्रारीवरून यापूर्वी अजयविरोधात छळाचा गुन्हा नोंद आहे. काल प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी सुरू असूून, तक्रारीत तथ्य आढळल्यास आरोपीला अटक केली जाईल.