‘त्या’ मयत महिलेच्या नातेवाईकांना मदत

By Admin | Updated: June 20, 2014 00:46 IST2014-06-20T00:01:24+5:302014-06-20T00:46:43+5:30

लातूर : शहरातील एमआयडीसीतील एका डाळ मिलमधील मशिनवर काम करणाऱ्या महिला कामगाराचा अडकून बुधवारी मृत्यू झाला़

'She' helped the widows' relatives | ‘त्या’ मयत महिलेच्या नातेवाईकांना मदत

‘त्या’ मयत महिलेच्या नातेवाईकांना मदत

लातूर : शहरातील एमआयडीसीतील एका डाळ मिलमधील मशिनवर काम करणाऱ्या महिला कामगाराचा अडकून बुधवारी मृत्यू झाला़ याप्रकरणी गुरुवारी कारखाना व्यवस्थापनाने मयत महिलेच्या नातेवाईकांना साडेतीन लाख रुपयांची मदत करण्याबरोबरच विम्याचा लाभ मिळवून देणार असल्याचे सांगितले़
शहरातील एमआयडीसीतील सी १९ प्लॉटमधील माहेश्वरी पल्सेस दाळ मिलमध्ये बुधवारी शबाना महेबूब पठाण ही महिला कामगार नेहमीप्रमाणे पॉलिशवरम मशिनवर डाळ पॉलिश करीत होती़ दरम्यान, ती मशिनमध्ये अडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला़ या महिलेचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता़
गुरुवारी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा घेतला़ त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने या महिलेच्या नातेवाईकास साडेतीन लाख रुपये मदत देण्याबरोबरच कामगार विम्याचा लाभ मिळवून देणार असल्याचे सांगितले़ त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन दफनविधी केला़ (प्रतिनिधी)
मिल मालक देणार साडेतीन लाख रुपये...
सदरील घटना ही दुर्देवी असून मयत महिलेच्या नातेवाईकांस २० जूनपर्यंत साडेतीन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे़ तसेच कामगार विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे कारखान्याचे मालक श्रीकांत काल्या यांनी सांगितले़

Web Title: 'She' helped the widows' relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.