‘ती’ वासरे दगावली थंडीने !

By Admin | Updated: December 31, 2014 01:03 IST2014-12-31T00:45:52+5:302014-12-31T01:03:03+5:30

बीड : माजलगाव तालुक्यातील शिंपेटाकळी येथे रविवारी सोळा वासरे दगावली होती़ सोमवारी पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हास्तरीय पथकाने गावात जाऊन

'She' calves scorched! | ‘ती’ वासरे दगावली थंडीने !

‘ती’ वासरे दगावली थंडीने !


बीड : माजलगाव तालुक्यातील शिंपेटाकळी येथे रविवारी सोळा वासरे दगावली होती़ सोमवारी पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हास्तरीय पथकाने गावात जाऊन निदान केले़ वासरांचा मृत्यू थंडीने झाल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला़
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ एस़ के़ तुंबारे, सहायक आयुक्त पशू सर्व चिकित्सालय डॉ़ शैलेश केंडे, पशुधन विकास अधिकारी तांत्रिक सहायक दिलीप मोरे आदींचा चमू सोमवारी शिंपेटाकळीत धडकला़ नदीपात्रात एक म्हैस व एका वासराचे मृतदेह आढळले़ या गुरांची तेथेच उत्तरीय तपासणी केली़ तपासणीअंती नेमका आजार आढळून आलेला नाही;परंतु फुफ्फूसात न्यूमोनियाची लक्षणे दिसून आली़ हे गाव गोदाकाठी आहे़ तापमान ८ अंश सेल्सियसपेक्षा कमी आहे़
त्यामुळे थंडीने गुरे दगावल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ तुंबारे यांनी सांगितले़ गुरांच्या मांसाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत़ दगावलेली गुरे उघड्यावरच टाकलेली होती़
चारा- पाण्यातून गुरांचे आजार वाढण्याची भीती असल्याने मृत गुरांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ तुंबारे यांनी दिल्या़(प्रतिनिधी)

Web Title: 'She' calves scorched!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.