शौर्य, सियाने जिंकली राज्य रँकिंग टेनिस स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:22 IST2018-02-19T00:22:21+5:302018-02-19T00:22:30+5:30

गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रात रविवारी झालेल्या १0 वर्षांखालील मुलांच्या राज्यस्तरीय रँकिंग टेनिस स्पर्धेत मुंबईच्या शौर्य शर्माने विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पुण्याची सिया प्रसाद हिने अजिंक्यपद मिळवले. मुंबईचा विव्हान करांदे याने मुलांच्या तर मुलींच्या गटात सोलापूरच्या नैनिका रेड्डीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुलांच्या गटातील अंतिम फेरी मुंबईच्याच दोन खेळाडूंत झाली. त्यात शौर्य शर्मा याने विव्हा

Shaurya, Sian win state ranking tennis competition | शौर्य, सियाने जिंकली राज्य रँकिंग टेनिस स्पर्धा

शौर्य, सियाने जिंकली राज्य रँकिंग टेनिस स्पर्धा

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रात रविवारी झालेल्या १0 वर्षांखालील मुलांच्या राज्यस्तरीय रँकिंग टेनिस स्पर्धेत मुंबईच्या शौर्य शर्माने विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पुण्याची सिया प्रसाद हिने अजिंक्यपद मिळवले. मुंबईचा विव्हान करांदे याने मुलांच्या तर मुलींच्या गटात सोलापूरच्या नैनिका रेड्डीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
मुलांच्या गटातील अंतिम फेरी मुंबईच्याच दोन खेळाडूंत झाली. त्यात शौर्य शर्मा याने विव्हान करांदे याचा ५-३, ४-0 असा पराभव करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मुलींच्या गटात पुण्याच्या सिया प्रसादे हिने अंतिम फेरीत सोलापूरच्या नैनिका रेड्डी हिच्यावर २-४, ४-0, ४-0 अशी मात करीत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. सुनील आव्हाड, गजेंद्र भोसले, टुर्नांमेंट सुपरवायझर प्रवीण गायसमुद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

 

Web Title: Shaurya, Sian win state ranking tennis competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.