परतूर अध्यक्षपदी शहाणे

By Admin | Updated: July 17, 2014 01:07 IST2014-07-17T01:05:32+5:302014-07-17T01:07:08+5:30

परतूर : नगरपालिकेच्या अध्यक्षपदी नगर विकास आघाडीच्या सुनंदा शहाणे यांची निवड झाली असून, त्यांनी अकरा विरूद्ध सहा मतांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी शेख करीमाबी यांचा पराभव केला.

Shanak as the President of the post | परतूर अध्यक्षपदी शहाणे

परतूर अध्यक्षपदी शहाणे

परतूर : नगरपालिकेच्या अध्यक्षपदी नगर विकास आघाडीच्या सुनंदा शहाणे यांची निवड झाली असून, त्यांनी अकरा विरूद्ध सहा मतांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी शेख करीमाबी यांचा पराभव केला. तर उपाध्यक्षपदी आघाडीच्याच विशाखा विजय राखे यांची निवड झाली. आघाडीची मते कायम राहिली.
परतूर नगरपालिकेच्या सभागृहात आज ही निवडणूक पार पडली. जिल्ह्यात सर्वत्र नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असताना परतूर पालिकेत मात्र, सुनंदा शहाणे, मंगेश डहाळे व शेख करीमाबी असे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
मंगेश डहाळे यांनी माघार घेतल्यानंतर सुनंदा शहाणे व काँग्रेसच्या शेख करीमाबी यांच्यात लढत होऊन सुनंदा शहाणे यांना अकरा मते तर शेख करीमाबी यांना सहा मते मिळाल. सहा विरूद्ध अकरा मते घेवून सुनंदा शहाणे विजयी झाल्या.
या निवडणुकीत भाजपाचे एकमेव नगरसेवक श्याम तेलगड हे अनुपस्थित राहिले. नगरपालिकेत आ. सुरेशकुमार जेथलिया या सभापती बाबासाहेब आकात यांची आघाडी आहे. उपाध्यक्षपदासाठी विशाखा राखे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी अन्सारी अल्मास यांचा ११ विरूद्ध ६ मतांनी पराभव केला.
या प्रसंगी आ. सुरेशकुमार जेथलिया, मावळत्या अध्यक्षा विमलताई जेथलिया, अखिलोद्दीन काजी, कुणाल आकात, नगरसेवक बाबूराव हिवाळे, मंगेश डहाळे, राजेश खंडेलवाल, राजेश भुजबळ, मरियमबी अन्सारी, विजय राखे, पं.स.सदस्य कपिल आकात आदी उपस्थित होते. नूतन अध्यक्षा, उपाध्यक्षांची मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Shanak as the President of the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.