२७ तासानंतर सापडला शहाबाजचा मृतदेह
By Admin | Updated: May 29, 2017 00:21 IST2017-05-29T00:19:18+5:302017-05-29T00:21:44+5:30
बीड : भाऊ व चुलत्यासोबत पोहण्यासाठी गेलेला शहाबाज शेख (१९, रा गांधी नगर, बीड) हा शनिवारी दुपारी बिंदुसरा धरणात बुडाला होता.

२७ तासानंतर सापडला शहाबाजचा मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : भाऊ व चुलत्यासोबत पोहण्यासाठी गेलेला शहाबाज शेख (१९, रा गांधी नगर, बीड) हा शनिवारी दुपारी बिंदुसरा धरणात बुडाला होता. इतर तिघे सुखरूप होते. परंतु शहाबाजचा मृतदेह मिळाला नाही. यंत्रणा उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांनीच त्याचा शोध घेतला असता २७ तासानंतर तो मिळून आला. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविवारपासून रमजान महिन्यास सुरूवात होत असल्याने शहाबाज पार्टी करण्यासाठी काका जाकेर शेख, चुलत भाऊ शेख अल्ताफ, शेख नदीम यांच्यासोबत गेला होता. पार्टी झाल्यानंतर ते पोहण्यासाठी धरणात उतरले. याचवेळी पाण्याचा अंदाज न आल्याने शहाबाज बुडाला. इतर तिघांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. प्रशासनाकडून मदत न मिळाल्याने १५ ते २० नातेवाईकांनी धरणात शहाबाजचा शोध घेतला. रविवारी दुपारी ४ वाजता तो मिळून आला. जिल्हा रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.