शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

दहावीच्या मुलींसोबत अश्लील चाळे; कोचिंग क्लासचे ‘सर’ गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2021 5:26 PM

दामिनी पथकाने शिकवणी लावायची असल्याचे सांगून क्लासचालकाला घेतले ताब्यात

औरंगाबाद : दहावीतील विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या खासगी क्लासेसचा चालक आणि शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. एका मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला असल्याची माहिती निरीक्षक शरद इंगळे यांनी दिली. अमोल रावसाहेब गवळी (वय ३३, रा. पडेगाव) असे या शिक्षकाचे नाव आहे.

दहावीत शिक्षण घेत असलेल्या एका १५ वर्षीय विद्यार्थिनीच्या माजी सैनिक पित्याने दामिनी पथकास फोन करून मुलीची क्लासचालक छेड काढत असल्याचे सांगितले. दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, हवालदार आशा गायकवाड, निर्मला निंभोरे, लता जाधव आणि चालक गिरीजा आंधळे यांच्या पथकाने पडेगाव गाठले. आधी त्यांनी छेड काढण्यात येत असलेल्या मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. तेव्हा क्लासचा चालक असलेला शिक्षक अमोल गवळी हा मुलींच्या अंगाला सतत हात लावणे, अश्लील बोलणे, भौतिकशास्त्र शिकवताना त्यातील अश्लीलता सांगणे, तुम्ही माझ्यासोबत संबंध ठेवल्यास काही होत नाही, असे सतत बोलत असल्याची आपबिती मुलीने सांगितली. मोबाइलवर अश्लील मेसेजही त्याने पाठविल्याचे मुलीने दाखवले. त्यानंतर उपनिरीक्षक उमाप व आंधळे या साध्या वेशात गवळीच्या क्लासमध्ये गेल्या. ‘सर, तुम्ही फिजिक्स विषय खूप चांगला शिकवता. आमच्या मुलींनाही शिकवणी लावायची आहे’ असे त्यास सांगितले. त्याच्याकडून क्लासची पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यांनी आपले खरे रूप दाखविले. छावणी पोलिसांची गाडी बोलावून घेत गवळी यास ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. तेथे मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. त्यानंतर सहायक निरीक्षक मनीषा हिवराळे यांनी मुलीचा जबाब नोंदवला. गवळी याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत विनयभंगासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास निरीक्षक शरद इंगळे करीत आहेत.

तक्रारीसाठी मुली पुढे येईनातदामिनी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार विवाहित असलेल्या या शिक्षकाने क्लासमधील इतर मुलींचीही छेड काढली होती. मात्र मुलींनी भीतीपोटी त्याची माहिती पालकांना दिली नाही. एकाच मुलीने शिक्षकाच्या कृत्याची माहिती पालकांना दिली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादsexual harassmentलैंगिक छळ