बजाजनगरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 20:31 IST2019-03-27T20:31:15+5:302019-03-27T20:31:25+5:30
एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच बजाजनगरात उघडकीस आली आहे.

बजाजनगरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
वाळूज महानगर : एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच बजाजनगरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी विजय राऊत याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजाजनगरातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असून, ती दररोज शिकवणी वर्गाला जाते. २३ मार्चला सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ही अल्पवयीन मुलगी शिकवणी वर्गासाठी गेली होती. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मुलीला आणण्यासाठी तिची आई गेली. वर्गाच्या जवळ गेल्यानंतर आईला ती ओळखीच्या विजय राऊत याच्या घराजवळ दिसून आली. त्यामुळे आईने मुलीला सोबत घेऊन राऊत याच्या घरी गेली. तिथे काही काळ थांबल्यानंतर घरी गेली. दुसऱ्या दिवशी २४ मार्चला त्या मुलीने त्रास होत असल्याचे आईला सांगितले. आईने मुलीकडे चौकशी केली असता तिने घटनेची माहिती दिली.
मुलीची आपबीती ऐकुण धक्का बसलेल्या आईने या प्रकाराची माहिती तिच्या वडिलांना दिली. वडीलाने आरोपी विजय राऊतला जाब विचारला असता त्याने माझे चुकले, मला माफ करा असे सांगितले. या घटनेनंतर समाजात बदनामी होईल, या भितीमुळे त्या मुलीच्या पालकांनी तक्रार दिली नव्हती. मात्र नातेवाईकांनी धीर दिल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरुन विजय राऊत या नराधमाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.