सातव यांना २२ व्या फेरीत मिळाली मतांची आघाडी

By Admin | Updated: May 17, 2014 00:58 IST2014-05-17T00:38:56+5:302014-05-17T00:58:13+5:30

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस- राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांना तब्बल २२ व्या फेरीमध्ये निर्णयाक आघाडी मिळाली

Seventh votes got the lead in the 22nd round | सातव यांना २२ व्या फेरीत मिळाली मतांची आघाडी

सातव यांना २२ व्या फेरीत मिळाली मतांची आघाडी

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस- राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांना तब्बल २२ व्या फेरीमध्ये निर्णयाक आघाडी मिळाली. त्यानंतर मात्र सातव यांनी पुढील दोन फेर्‍यांमध्ये आघाडी कायम ठेवत निसटता विजय मिळविला. हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरूवात झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, केंद्रीय निवडणूक निरीक्षक जे. आर. कटवाल यांची उपस्थिती होती. प्रारंभी पोस्टल मतांची मोजणी सुरू करण्यात आली; परंतु या मोजणीला बराच वेळ लागला. एकीकडे पोस्टल मते सुरू असताना दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना २ हजार १४२ मतांची आघाडी मिळाली. यावेळी वानखेडे यांना १९ हजार ९७० तर सातव यांना १७ हजार ८२८ मते मिळाली. दुसर्‍या फेरीतही वानखेडे यांना ७ हजार ६८ मतांची आघाडी मिळाली. यावेळी वानखेडे यांना एकूण ४२ हजार ९३२ तर सातव यांना ३५ हजार ८६४ मते मिळाली. त्यानंतर तिसर्‍या फेरीत वानखेडे यांना ६ हजार ५४ मतांची आघाडी मिळाली. यावेळी त्यांना ६२ हजार ९०६ तर सातव यांना ५६ हजार ८०६ मते मिळाली. चौथ्या फेरीत वानखेडे यांना ४ हजार ४९२ मतांची आघाडी मिळाली. यामध्ये वानखेडे यांना ८३ हजार ६४७ तर सातव यांना ७९ हजार ५५ मते मिळाली. पाचव्या फेरीत वानखेडे यांना ५ हजार ४२३ मतांची आघाडी मिळाली. यामध्ये वानखेडे यांना १ लाख ५ हजार ८६४ तर सातव यांना १ लाख ४४१ मते मिळाली. सहाव्या फेरीत वानखेडे यांची आघाडी कमी झाली असली तरी त्यांना १ हजार ९७० मतांची आघाडी मिळाली. यामध्ये वानखेडे यांना १ लाख २५ हजार ३९६ तर सातव यांना १ लाख २३ हजार ४२६ मते मिळाली. सातव्या फेरीत वानखेडे यांना ४ हजार ६७ मतांची आघाडी मिळाली. त्यामध्ये त्यांना एकूण १ लाख ४६ हजार ४४३ तर सातव यांना १ लाख ४२ हजार ३७६ मते मिळाली. आठव्या फेरीत वानखेडे ६ हजार ६२३ मतांची आघाडी मिळाली. त्यामध्ये त्यांना १ लाख ६८ हजार ५८६ मते मिळाली. तर सातव यांना १ लाख ६१ हजार ९६३ मते मिळाली. नवव्या फेरीत वानखेडे यांना ८ हजार ७९६ मतांची आघाडी मिळाली. त्यामध्ये त्यांना एकूण १ लाख ९१ हजार २४८ तर सातव यांना १ लाख ८२ हजार ४५२ मते मिळाली. दहाव्या फेरीत वानखेडे यांना ८ हजार ४६१ मतांची आघाडी मिळाली. त्यामध्ये त्यांना २ लाख ११ हजार ६५५ तर सातव यांना २ लाख ३ हजार १९४ मते मिळाली. अकराव्या फेरीत वानखेडे यांना १० हजार ८० मतांची आघाडी मिळाली. त्यामध्ये त्यांना २ लाख ३३ हजार ४४९ तर सातव यांना २ लाख २३ हजार ३६९ मते मिळाली. बाराव्या फेरीत वानखेडे यांना ११ हजार ४६० मतांची आघाडी मिळाली. त्यात वानखेडे यांना २ लाख ५३ हजार ६६२ तर सातव यांना २ लाख ४२ हजार २०२ मते मिळाली. तेराव्या फेरीत वानखेडे यांना १० हजार ५०९ ची आघाडी मिळाली. त्यांना २ लाख ७५ हजार ६४६ तर सातव यांना २ लाख ६५ हजार १३७ मते मिळाली. चौदाव्या फेरीत वानखेडे यांना १३ हजार ३०२ मतांची आघाडी मिळाली. त्यामध्ये त्यांना २ लाख ९९ हजार १३० तर सातव यांना २ लाख ८५ हजार ८२८ मते मिळाली. पंधराव्या फेरीत वानखेडे यांना १३ हजार २८८ मतांची आघाडी मिळाली. यामध्ये त्यांना ३ लाख १९ हजार ७८७ तर सातव यांना ३ लाख ६ हजार ४९९ मते मिळाली. सोळाव्या फेरीत वानखेडे यांना १३ हजार १०८ मते मिळाली. यामध्ये त्यांना एकूण ३ लाख ३९ हजार ७७७ तर सातव यांना ३ लाख २६ हजार ६६९ मते मिळाली. सतराव्या फेरीत वानखेडे यांना ७ हजार ११० ची आघाडी मिळाली. त्यांना एकूण ३ लाख ५८ हजार ३२२ तर सातव यांना ३ लाख ५१ हजार २१२ मते मिळाली. अठराव्या फेरीत वानखेडे यांना ४ हजार ५७३ ची आघाडी मिळाली. त्यामध्ये त्यांना ३ लाख ७८ हजार ३६० तर ३ लाख ७३ हजार ७८७ मतांची आघाडी मिळाली. एकोणविसाव्या फेरीत वानखेडे यांची आघाडी ४०५ पर्यंत आली. त्यामध्ये त्यांना एकूण ३ लाख ९७ हजार ७२३ तर सातव यांना ३ लाख ९७ हजार ३१८ मते मिळाली. विसाव्या फेरीत वानखेडे यांना २२० मतांची आघाडी मिळाली. त्यांना एकूण ४ लाख १८ हजार ५६४ तर सातव यांना ४ लाख १८ हजार ३४४ मते मिळाली. एकविसाव्या फेरीत वानखेडे यांना ४६९ मतांची आघाडी मिळाली. त्यांना एकूण ४ लाख ३७ हजार ८८४ तर सातव यांना ४ लाख ३७ हजार ४१५ मते मिळाली. बाविसाव्या निर्णायक फेरीत सातव यांना १ हजार ७३२ मतांची आघाडी मिळाली. त्यामध्ये त्यांना एकूण ४ लाख ५४ हजार ४३० तर वानखेडे यांना ४ लाख ५२ हजार ६७८ मते मिळाली. तेविसाव्या फेरीत सातव यांना ३६१ मतांची आघाडी मिळाली. त्यांना ४ लाख ६२ हजार २८९ तर वानखेडे यांना ४ लाख ६१ हजार ९२८ मते मिळाली. चोविसाव्या अंतिम फेरीत सातव यांना १ हजार ७५४ मतांची आघाडी मिळाली. त्यांना ४ लाख ६६ हजार ४८३ तर वानखेडे यांना ४ लाख ६४ हजार ७२९ मते मिळाली. पोस्टल मतांमध्ये सातव यांना ९१४ तर वानखेडे यांना १ हजार ३६ मते मिळाली.अंतिम निकालात सातव १ हजार ६३२ मतांनी विजयी झाले.

Web Title: Seventh votes got the lead in the 22nd round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.