शेवटच्या क्षणी सातवांची बाजी
By Admin | Updated: May 17, 2014 00:58 IST2014-05-17T00:41:43+5:302014-05-17T00:58:13+5:30
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्टÑवादी-पीरिपा आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांनी निसटता विजय मिळवून सर्वांनाच चकित केले.

शेवटच्या क्षणी सातवांची बाजी
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्टÑवादी-पीरिपा आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांनी निसटता विजय मिळवून सर्वांनाच चकित केले. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणार्या या निवडणुकीच्या निकालात अखेरच्या क्षणी बाजी मारत सातव यांनी पाचव्यांदा हिंगोलीची जागा काँग्रेसच्या पारड्यात टाकली. हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार चांगलाच गाजला. काँग्रेस- राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांनी प्रचारात विकासाचे मुद्दे मांडले. साडेचार वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवला. याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत झाला. दुसरीकडे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी मात्र विकासाच्या मुद्यावर चुप्पी साधत संपूर्ण प्रचारात भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याच नावाचा जप केला. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपणाला विजय करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. संपूर्ण देशात नरेंद्र मोदीची लाट आली असली तरी हिंगोलीत मात्र मोदींची लाट म्हणावी तशी आली नसल्याचेच या निकालाने दाखवून दिले. प्रचारात वानखेडे राजीव सातव यांच्यावर वैयक्तिक हल्ले करीत होते तर सातव मात्र विकासाचाच मुद्दा प्रचारात प्रखरपणे मांडत होते. हा मुद्दाही सातव यांच्या पथ्यावर पडला. या निवडणुकीत पडद्यामागे बर्याच मोठ्या घडामोडी घडल्या. वैयक्तिक द्वेषातून राष्टÑवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी राजीव सातव यांच्या विरोधात जोरदार सुभाष वानखेडे यांचा प्रचार केला. काही नेत्यांनी आर्थिक रसदही पुरविली; परंतु याचा उलटा परिणाम दिसून आला. राष्टÑवादीच्या नेत्यांनी वानखेडे यांच्याशी साधलेली जवळीक शिवसेनेच्या काही नेत्यांना रूचली नाही. शिवाय गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांवर वानखेडे यांनी केलेली कुरघोडी दोन्ही आमदारद्वयांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. तसेच ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कळमनुरी, वसमत व औंढा नागनाथ येथील शिवसेनेच्या तालुका प्रमुख व उपजिल्हाप्रमुखांना बदलल्याचा फटकाही वानखेडे यांना बसला. याचे संकेत हिंगोली येथे गजाननराव घुगे यांच्या निवासस्थानी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत वानखेडे यांना मिळाले होते; परंतु झालेली चूक सुधारण्याऐवजी वानखेडे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याची त्यांना पराभवाने किंमत चुकवावी लागली. जिंकल्याचे कारण केलेल्या विकासकामांचा फायदा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केले काम सूक्ष्म पातळीवरील नियोजन शिवसेनेतील गटबाजीचा फायदा हरल्याचे कारण शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा फटका अति आत्मविश्वास नडला जातीय समीकरणामुळे गणित बिघडले विकासाच्या मुद्यावर चुप्पी या कारणांमुळे मिळाला विजय गोळेगाव येथे कृषी महाविद्यालय, कळमनुरी येथे आदिवासी प्रकल्प कार्यालय, येलकी येथे सीमा सशस्त्र बलाचे प्रशिक्षण केंद्र, कळमनुरीत उपजिल्हा रूग्णालय आदी विकासकामे खेचून आणल्याने मिळाला विजय. संपूर्ण निवडणुकीत प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करून नेत्यांसोबत कार्यकर्त्यांशीही संपर्क वाढविला. सर्वसामान्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी गप्पा मारीत केलेले प्रचाराचे नियोजन राजीव सातव यांच्या पडले पथ्यावर. जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून शिवसेनेत निर्माण झालेली गटबाजी राजीव सातव यांच्यासाठी फायद्याची ठरली. या नाराजीचा पुरेपूर फायदा सातव यांनी प्रचारात घेतला. शिवाय राष्टÑवादीच्या ज्या नेत्यांनी सातव यांच्या विरोधात प्रचार केला त्यामुळेही काही सेना नेत्यांशी त्यांची जवळीक वाढली.