शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

सातबाऱ्याला पीक पेऱ्याची नोंदच नाही

By admin | Updated: December 22, 2014 23:33 IST

पुरुषोत्तम करवा , माजलगाव महाराष्ट्र शासनाने तलाठ्याचा ताण कमी करुन सर्व शेतकऱ्यांना गावागावात सातबारा मिळावा, यासाठी २०१०-११ साली संगणकीकृत सातबारा देण्यास सुरुवात केली.

पुरुषोत्तम करवा , माजलगावमहाराष्ट्र शासनाने तलाठ्याचा ताण कमी करुन सर्व शेतकऱ्यांना गावागावात सातबारा मिळावा, यासाठी २०१०-११ साली संगणकीकृत सातबारा देण्यास सुरुवात केली. चार वर्षांपासून हे मिळत असले तरी यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. याची अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. पूर्वीचा पीक पेराच अद्यापपर्यंत नोंद असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.करोडो रुपये खर्च करुन शेतकऱ्यांना कुठेही सातबारा मिळावे, यासाठी संगणकीकृत सुविधा सुरू केली. माजलगाव तहसीलने २०११ सालीच हस्तलिखित सातबाराचे संगणकीय सातबाराचे काम पूर्ण केले होते. या संगणकीकृत सातबारामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका असून, या झालेल्या चुका अद्यापही तहसील कार्यालयाने काढलेल्या नाहीत. या सातबाऱ्यामध्ये अनेकांचे क्षेत्र कमी तर अनेकांचे जास्त झाले आहे. २०११ सालापासून ज्या शेतकऱ्यांनी जमीन विकत घेतली त्यांचे चार वर्षांपासून संगणकीकृत सातबाऱ्याला फेर न ओढल्याने सातबाऱ्याला नावच लागलेले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या जमिनीचा सातबारा काढून त्यावर कर्ज उचलण्याच्या अनेक घटना या तहसील कार्यालयांर्तगत घडलेल्या आहेत. तर अनेकांनी अनेक बँकांकडून कर्ज घेतले आहे. मात्र संगणकीकृत सातबारावर अद्याप बोजा चढविलेला नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा-पुन्हा कर्ज उचलल्याचे आढळून आले आहे. माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील एकाही शेतकऱ्याच्या सातबारावर पीक पेऱ्याची नोंद नसल्याचे आढळून आले आहे. संगणकीकृत सातबाराला पीक पेरा ओढा नसल्याने गारपिटीत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक एक होते व सातबाऱ्याला दुसरेच, यामुळे अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात अडचणी आल्या. सध्या माजलगाव बाजार समितीअंतर्गत शासनाची कापसाची सीसीआयमार्फत खरेदी चालू असल्याने त्याठिकाणी शेतकऱ्यांना पीक पेऱ्याची नोंद नसल्याने शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर विविध अडचणी येत आहेत. याबाबत तहसीलदार डॉ. अरुण जराट म्हणाले, जेंव्हापासून सातबारा संगणकीकृत करण्यात आला तेंव्हापासून आॅनलाईन अपडेट बंदच आहे. याचे काम तात्काळ करू.