सात पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

By Admin | Updated: May 29, 2014 00:23 IST2014-05-29T00:07:25+5:302014-05-29T00:23:34+5:30

हिंगोली : राज्याच्या पोलिस महासंचालकांनी राज्यभरातील पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

Seven police officers transfers | सात पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

सात पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

हिंगोली : राज्याच्या पोलिस महासंचालकांनी राज्यभरातील पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील पाच पोलिस निरीक्षक व एका सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि एका पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. बदल्यासंदर्भात २७ मे रोजी आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संग्राम सांगळे यांची वाशिम येथे तर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि शेख रऊफ यांची जालना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. कळमनुरी येथील पोनि दौलतराव जाधव यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तर आखाडा बाळापूरचे पोनि महेंद्र देशमुख यांची बुलडाणा जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. पोलिस मुख्यालयातील राखीव पोलिस निरीक्षक विजयकुमार दाणी यांची नाशिक येथे बदली करण्यात आली आहे. तसेच कुरूंदा पोलिस ठाण्याचे सपोनि हनुमंत रेजितवाड यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली करण्यात आली आहे. पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक सुरेश तोटावार यांची अमरावती परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकार्‍यांना नवीन ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Seven police officers transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.