तक्रारींचा वेळेत निपटारा करा
By Admin | Updated: April 28, 2015 00:29 IST2015-04-28T00:23:55+5:302015-04-28T00:29:19+5:30
उस्मानाबाद : शहरातील नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेवून या तक्रारींचा वेळेत निपटारा करावा, अशा सूचना माजी राज्यमंत्री आ़ राणाजगजितसिंह पाटील

तक्रारींचा वेळेत निपटारा करा
उस्मानाबाद : शहरातील नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेवून या तक्रारींचा वेळेत निपटारा करावा, अशा सूचना माजी राज्यमंत्री आ़ राणाजगजितसिंह पाटील यांनी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या़ नगर पालिकेत सोमवारी शहरवासियांच्या समस्यांबाबत बैठक बोलाविण्यात आली होती़ या बैठकीत ७५ नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या़
शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासह ते सोडविण्याबाबत माजी राज्यमंत्री आ़ राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक झाली़ यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मुख्याधिकारी शशिमोहन नंदा यांची प्रमुख उपस्थिती होती़
यावेळी शहरातील ७५ नागरिकांनी प्रभागनिहाय समस्या मांडल्या़ यात उजनीचा पाणीपुरवठा, तुंबणाऱ्या गटारी, रस्त्यांची झालेली दुरवस्था, प्रभागात घंटागाड्या न येणे, गटारी, कचराकुंडी साफ न करणे, बंद पडलेले पथदिवे, रस्त्यावर पडलेली वाळू, खडीमुळे होणारा त्रास आदी विविध समस्या मांडण्यात आल्या होत्या़ आलेल्या तक्रारीची माहिती व त्या सोडविण्याबाबत असलेल्या अडचणींची माहिती विभागाच्या प्रमुखांकडून आ़ पाटील यांनी घेतली़ नागरिकांची अडचणींबाबत मते जाणून घेत त्यांच्याशी चर्चा केली़ त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या़ शिवाय दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून आतापासूनच योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत मुख्याधिकारी नंदा यांना सूचना दिल्या़ यावेळी नगरसेवक संपत डोके, अमित शिंदे, कुणाल निंबाळकर, माळी, पृथ्वीराज चिलवंत, अभय इंगळे, बापू पवार, बबलू शेख, अफरोज पिरजादे नागरिक उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
नाल्यांची अवस्था पहा
जुना बसडेपोच्या मागे असलेल्या खंडोबा मंदीर शेजारील भागातील नाल्यांची मोठी दुरवस्था झाली आहे़ त्यामुळे नागरिकांसह नगर परिषद शाळा क्ऱ१३ मधील चिमुकल्यांच्या आरोग्यावरही याचा विपरित परिणाम होत आहे़ अनेकांच्या घरात हे पाणी जात आहे़ तरी पालिका प्रशासनाने या परिसराला भेट देवून नाल्यांची पाहणी करावी, नाल्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़ निवेदनावर सुनिल निकम, तुकाराम गायकवाड, रणजित साळुंके, ज्ञानेश्वर गायकवाड, सतिश साळुंके, रौफ शेख आदीची स्वाक्षरी आहे़