हजारो विद्यार्थ्यांच्या नावात गंभीर चुका

By Admin | Updated: April 28, 2016 00:21 IST2016-04-28T00:10:35+5:302016-04-28T00:21:42+5:30

औरंगाबाद : ‘सीबीएसई’तर्फे ३ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या ‘जेईई-मेन्स’चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.

Serious errors in thousands of students | हजारो विद्यार्थ्यांच्या नावात गंभीर चुका

हजारो विद्यार्थ्यांच्या नावात गंभीर चुका

औरंगाबाद : ‘सीबीएसई’तर्फे ३ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या ‘जेईई-मेन्स’चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या नावात चुका झालेल्या आहेत. एचएससी बोर्डाने दिलेल्या चुकीच्या हॉल तिकिटामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप पालकांनी केला आहे. चुकीच्या नावामुळे आता जेईई-अ‍ॅडव्हान्सचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
मार्च-२०१६ मध्ये घेण्यात आलेल्या एचएससी बोर्ड परीक्षेमध्ये चुकीचे हॉल तिकीट देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अशा परिस्थितीत जेईई-मेन्स परीक्षेचे हॉल तिकीटदेखील ‘सीबीएसई’कडून चुकीचे आले. बुधवारी याचा निकाल जाहीर झाला. यात अनेकांची नावे चुकली. त्यामुळे अशा चुकीच्या नावाने आता मुलांनी जेईई-अ‍ॅडव्हान्सचा अर्ज कसा भरावा, असा प्रश्न पालकांसमोर उभा आहे. बोर्डाने चुकीच्या नावामध्ये दुरुस्ती न केल्याने हा सर्व प्रकार झाला. अशा चुकीमुळे ऐन अभ्यासाच्या कालावधीत विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आले आहेत.
मे महिन्यात होणाऱ्या जेईई-अ‍ॅडव्हान्ससाठी अर्ज भरण्यासाठी २९ एप्रिलपासून सुरुवात होईल. यासाठी अवघ्या सहा दिवसांचा कालावधी आहे. सीबीएसई बोर्डाकडून चुकीच्या नावांचा स्वीकार केला जाणार नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बोर्डाची चूक
बोर्डाने चुकीच्या नावात दुरुस्ती केली नाही. चुकीची नावे सीबीएसई बोर्डाला पाठविण्यात आली. त्यामुळे जवळपास ४ हजारांवर विद्यार्थ्यांचे निकाल चुकीच्या नावाने आले आहेत. त्यामुळे जेईई-अ‍ॅडव्हान्सचा अर्ज भरण्यासाठी अडचण येईल.
-प्रवीण पांडे, पालक
अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवा...
विद्यार्थ्यांच्या नावात बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जेईई-अ‍ॅडव्हान्सचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची आवश्यकता आहे.
-काकासाहेब जगताप, जिल्हाध्यक्ष,
प्राथमिक शिक्षक संघ
विद्यार्थ्यांनीच स्वत: भरले आॅनलाईन अर्ज
बारावी बोर्डाचे अर्ज हे आॅनलाईन पद्धतीने भरण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वत: अर्ज भरले होते. महाविद्यालयांकडूनही नावांची खात्री करून घेण्यात आली होती. ही नावे राज्य मंडळाला पाठविण्यात आली होती, असे बोर्डाच्या विभागीय सचिव वंदना वाहूळ यांनी सांगितले.

Web Title: Serious errors in thousands of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.