सिडकोकडून जलवाहिनीची अर्धवट दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:08 IST2019-02-26T00:07:55+5:302019-02-26T00:08:20+5:30
लोकमतने वृत्त प्रकाशित करताच सिडको प्रशासनाने मुख्य जलवाहिनीची एका ठिकाणची गळती बंद केली आहे. मात्र, इतर ठिकाणी सुरू असलेल्या जलवाहिनीवरील गळतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सिडकोकडून जलवाहिनीची अर्धवट दुरुस्ती
वाळूज महानगर : लोकमतने वृत्त प्रकाशित करताच सिडको प्रशासनाने मुख्य जलवाहिनीची एका ठिकाणची गळती बंद केली आहे. मात्र, इतर ठिकाणी सुरू असलेल्या जलवाहिनीवरील गळतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकारामुळे प्रशासनाचे वेळकाढू धोरण समोर आले आहे.
सिडकोच्या मुख्य जलवाहिनीला जलकुंभाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी गळती लागल्याने पाण्याची नासाडी होत आहे. परिणामी नागरी वसाहतीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात सिडकोच्या जलवाहिनीची गळती थांबेना या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. या वृत्ताने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने सारा इलाईट वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची जलवाहिनीची गळती बंद केली. प्रशासनाने गळती बंद केल्याने काही प्रमाणात का होईना सुरूअसलेली पाण्याची नासाडी थांबली आहे. मात्र, प्रशासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे इतर ठिकाणी अजूनही गळती सुरूअसल्याने पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. जलवाहिनीवरील सर्व गळती दुरुस्ती करून थांबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
फोटो ओळ
सिडको प्रशासनाने सारा इलाईट वसाहतीकडे जाणाºया रस्त्यालगत जलवाहिनीची गळती बंद केली आहे.