शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बंडखोरांनी बाळासाहेब ठाकरेंचा शेवटचा आदेश का पाळला नाही?; चंद्रकांत खैरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:04 IST

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांना सवाल विचारला आहे.

औरंगाबाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करत आहे. मात्र माझ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना सांभाळा, असं आवाहन बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. मग बंडखोर आमदार आणि खासदारांनी बाळासाहेब ठाकरेंचा शेवटचा आदेश का पाळला नाही, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फक्त नावाचा वापर करायचा असून त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात काही घेणंदेणं नसल्याचं यावरुन दिसून येत आहे. जर बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा विचार समोर आला असता तर त्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केलीच नसती, असंही चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले. 

एकनाथ शिंदे यांच्या गटांनी सांगितले होते की, उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात कोणीही वक्तव्य करणार नाही. मात्र औरंगाबादमधील शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट ठाकरे कुटुंब विरुद्ध वक्तव्य करताना दिसून येत आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या संदर्भात वक्तव्य करू नाही, असंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.

बाळासाहेबांनी माकडांची माणसं केली- शिवसेनेचे नेते संजय राऊत

बाळासाहेबांनी माकडांची माणसं केली, ज्या माणसांना सरदार केलं त्यांनीच धक्का दिला, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी आता शिंदे गटावर घणाघात केला आहे. तसेच "ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. चुका सगळीकडेच होत असतात, कुटुंबातही होतात. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न केला. ठाकरे कुटुंब कमकुवत करण्याचा काहींचा मनसुबा आहे" असं म्हटलं आहे.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे